ICC T20 World Cup 2026 West Indies Allrounder Romario Shepherd Hat Trick : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या यंदाच्या हंगामातील पहिल्याच दिवशी दुसऱ्या सामन्यात हॅटट्रिक पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर मारियो शेफर्ड याने स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिकचा डाव साधला. वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा तो वेस्ट इंडिजचा पहिला गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही या षटकात ४ विकेट्स घेत त्याने यंदाच्या हंगामात पहिला 'पंजा'ही मारला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही दहावी हॅटट्रिक ठरली. या सामन्यात सहा विकेट्सचा डाव साधत त्याने संघाला पहिला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन वेळच्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिजच्या संघाने स्कॉटलंड विरुद्धच्या लढतीसह यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप हंगामाची सुरुवात केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना शेमरॉन हेटमायरच्या ३६ चेंडूतील ६४ धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा करत स्कॉटलंडसमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा बचाव करताना मारियो शेफर्डनं कमालीची गोलंदाजी करताना ६ विकेट्स घेत बांगलादेशच्या जागी टी-२० वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळालेल्या स्कॉटलंडला १४७ धावांवर रोखले.
ICC Men's T20 World Cup 2026 : नेदरलँड्सची एक चूक अन् सामना फिरला; पाकिस्तानची रडत खडत विजयी सलामी
स्कॉटलंडनं फाईट दिली, शेफर्डच्या भेदक माऱ्यानं ते बॅकफूटवर गेले
वेस्ट इंडिजच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडच्या संघाने चांगली फाईट दिली. पण शेफर्डच्या भेदक माऱ्यामुळे ते बॅकफूटवर गेले. मारियो शेफर्डनं स्कॉटलंडच्या डावातील १७ व्या षटकात मॅथ्यू क्रॉस, मायकल लीस्क,ऑलिव्हर डेव्हिडसन यांना तंबूत धाडत त्याने हॅटट्रिक पूर्ण केली.
टी वर्ल्ड कप स्पर्धेतील हॅटट्रिकचा रेकॉर्ड, एकाच गोलंदाजाने दोन वेळा केलीये ही कामगिरी
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन ( २००७) कर्टिस कॅम्पर (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड्स, अबू धाबी (२०२१)वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह (२०२१) कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, शारजाह (२०२१) कार्तिक मयप्पन (संयुक्त अरब अमिराती) विरुद्ध श्रीलंका, जीलॉंग (२०२२) जोश लिट्ल (आयर्लंड) विरुद्ध न्यूझीलंड, अॅडलेड (२०२२)पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, नॉर्थ साउंड (२०२४)पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध अफगाणिस्तान, जमैका (२०२४)ख्रिस जॉर्डन (इंग्लंड) विरुद्ध अमेरिका, ब्रिजटाउन (२०२४)रोमारियो शेफर्ड (वेस्ट इंडीज)* विरुद्ध स्कॉटलंड, कोलकाता (२०२६
Web Summary : Romario Shepherd's hat-trick against Scotland marked West Indies' first in T20 World Cup history. Shepherd also claimed 4 wickets in one over, contributing significantly to West Indies' victory. This is the tenth hat-trick in the tournament's history.
Web Summary : रोमारियो शेफर्ड की स्कॉटलैंड के खिलाफ हैट्रिक टी20 विश्व कप इतिहास में वेस्टइंडीज की पहली हैट्रिक है। शेफर्ड ने एक ओवर में 4 विकेट भी लिए, जिससे वेस्टइंडीज की जीत में महत्वपूर्ण योगदान मिला। यह टूर्नामेंट के इतिहास में दसवीं हैट्रिक है।