Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 : बालेकिल्ल्यात USA विरुद्ध सूर्या एकटा लढला! कॅप्टनच्या नाबाद ८४ धावांच्या जोरावर टीम इंडियाचं कमबॅक

भारतीय संघाची फलंदाजी कोलमडल्यावर कर्णधार शेवटपर्यंत मैदानात थांबला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 21:03 IST

Open in App

IND vs USA, ICC T20 World Cup 2026 : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात  USA विरुद्धच्या सलामीच्या  लढतीत सर्व फलंदाजांनी नांगी टाकली. भारतीय संघ अडचणीत  सापडला असताना बालेकिल्ल्यात सूर्यकुमार यादवची बॅट तळपली. त्याने शेवटपर्यंत मैदानात थांबून ४९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने केलेल्या ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित २० षटकात १६१ धावांपर्यंत मजल मारली. आता विजयी सलामी देण्याची जबाबदारी भारतीय गोलंदाजांवर असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाने गमावल्या चार विकेट्स! दोघांच्या पदरी भोपळा

USA विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने अवघ्या ४६ धावांवर पॉवर प्लेमध्ये आघाडीच्या चार विकेट्स गमावल्या, ईशान किशन याने १६ चेंडूत केलेल्या २० धावा आणि तिलक वर्मानं १६ चेंडूत २५ धावा करून तंबूचा रस्ता धरला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे या दोघांवर 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली.  

टीम इंडियाकडून सूर्या एकटा लढला! USA कडून सौरभ नेत्रावळक एकटा महागडा ठरला

अमेरिकन गोलंदाज ठराविक अंतराने धक्क्यावर धक्के देत असताना सूर्यकुमार यादवनं आपल्या  घरच्या मैदानात आपला क्लास दाखवत शेवटपर्यंत मैदानात तग धरुन भारताच्या धावफलकावर सन्मानजनक धावसंख्या उभारणारी खेळी केली. सूर्यकुमार यादवची लढवय्या खेळी वगळता फलंदाजीत एकाचाही निभाव लागला नाही. ईशान किशन २० (१६), तिलक वर्मा २५ (१६) आणि अक्षर पटेल १४ (११) वगळता अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.  USA च्या संघाकडून शॅडली वॅन शॉकविक याने ४ षटकात २५ धावा करत ४ विकेट्स घेत जलवा दाखवला. त्याच्याशिवाय हरमीत सिंग याने ४ षटकात २६ धावा खर्च करत २ तर अली खान याने २ षटकात १३ धावा खर्च करत एक विकेट घेतली. सौरभ नेत्रावळकर हा USA चा सर्वात महगडा गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात एकही विकेट न घेता ६५ धावा खर्च केल्या.य

English
हिंदी सारांश
Web Title : Suryakumar Yadav's heroic knock helps India overcome USA in T20.

Web Summary : Suryakumar Yadav's brilliant 84 rescued India against USA at Wankhede. Other batsmen faltered, but Yadav's innings powered India to 161. Now, the bowlers must secure the victory.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६सूर्यकुमार यादवभारतीय क्रिकेट संघ