Rohit Sharma Appointed As The Brand Ambassador Of ICC T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी ICC चे अध्यक्ष जय शहा यांनी या स्पर्धेतील सामने भारत आणि श्रीलंकेतील पाच मैदानात खेळवण्यात येणार असल्याची माहिती दिली. याशिवाय त्यांनी रोहित शर्मावर मोठी जबाबदारी देण्यात आल्याची घोषणाही केली. २०२४ च्या हंगामात भारतीय संघाला टी-२० चॅम्पियन करणाऱ्या रोहित शर्माला आगामी ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर करण्यात आले आहे. मुंबईत आयोजित खास कार्यक्रमात भारतीय टी-२० संघाचा विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव आणि भारतीय महिला संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणारी कर्णधार हरमनप्रीत कौरही उपस्थितीत होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितनं आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सोडलीये खास छाप
रोहित शर्मानं २०२४ च्या हंगामात भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत रोहित शर्मानं ३२.०१ च्या सरासरीसह १४०.८९ च्या स्ट्राइक रेटसह ४२३१ धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक ५ शतकांचा विश्वविक्रम त्याच्या नावे आहे. तो आता आगामी ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खास भूमिकेत दिसणार आहे.
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
कोणत्या मैदानात रंगणार टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने?
आयसीसी सीईओ संजोग गुप्ता यांनी इटली संघ या स्पर्धेतून वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण करण्यासाठी सज्ज असल्याची माहिती दिली.
५५ सामने ८ वेगवेगळ्या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी भारत आणि श्रीलंकेतील कोणत्या मैदानात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने खेळवण्यात येणार त्यासंदर्भातील माहिती दिली.
भारतातील या पाच मैदानात रंगणार थरार!
- अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
- इडन गार्डन्स, कोलकाता
- एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
- वानखेडे स्टेडियम, मुंबई
श्रीलंकेतील मैदान
- पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कँडी
- आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
- सिन्हलीज स्पोर्ट्स क्लब, कोलंबो