T20 World Cup 2026 Schedule Announced : भारत-श्रीलंकेच्या यजमानपदाखाली आयोजित १० व्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ICC च्या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यासाठी मुंबईत खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ICC आणि BCCI च्या पदाधिकाऱ्यांसह भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा, भारतीय टी-२० संघाचा विद्यमान कर्णधार सूर्यकुमार यादव आणि वनडे विश्वविजेत्या भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरसह श्रीलंकन कर्णधार अँजेलो मॅथ्यूजनं या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
७ फेब्रुवारी, २०२६ पासून रंगणार टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार
आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरुवात होणार असून ८ मार्च, २०२६ रोजी या स्पर्धेची फायनल खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंकेच्या मैदानात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येथील. आगामी हंगामातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी २० संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात ५-५ संघाचा समावेश असून प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ सुपर ८ स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या फेरीतून चार संघ सेमी फायनलमध्ये खेळताना दिसतील.
भारतीय संघ साखळी फेरीत कोणत्या संघाविरुद्ध कोणत्या मैदानात खेळणार?
भारत विरुद्ध अमेरिका ७ फेब्रुवारी, २०२६ मुंबई
भारत विरुद्ध नेदरलँड्स १२ फेब्रुवारी, २०२६ दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान १५ फेब्रुवारी, २०२६ (कोलंबो)
भारत विरुद्ध नेपाळ १८ फेब्रुवारी, २०२६ अहमदाबाद
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील संघ
यजमान भारत आणि श्रीलंका यांच्याशिवाय या स्पर्धत अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका (USA), वेस्टइंडीज, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान आणि युएई (UAE) या संघाचा समावेश आहे.
कोणत्या गटात कोण?
पहिल्या गटातील संघ
- भारत
- पाकिस्तान
- अमेरिका
- नामिबिया
- नेदरलँड्स
दुसऱ्या गटातील संघ
- ऑस्ट्रेलिया
- श्रीलंका
- झिम्बाब्वे
- आयर्लंड
- ओमान
तिसऱ्या गटातील संघ
- इंग्लंड
- वेस्ट इंडिंज
- इटली
- बांगलादेश
- नेपाळ
चौथ्या गटातील संघ
- दक्षिण आफ्रिका
- न्यूझीलंड
- अफगाणिस्तान
- युएई
- कॅनडा
ICC पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ वेळापत्रक
७ फेब्रुवारी (शनिवार)
- पाकिस्तान VS नेदरलँड्स – SSC, कोलंबो
- वेस्ट इंडिज VS बांगलादेश – कोलकाता
- भारत VS USA – मुंबई
- न्यूझीलंड VS अफगाणिस्तान – चेन्नई
८ फेब्रुवारी (रविवार)
- इंग्लंड VS नेपाळ – मुंबई
- श्रीलंका VS आयर्लंड – प्रेमदासा, कोलंबो
९ फेब्रुवारी (सोमवार)
- बांगलादेश VS इटली – कोलकाता
- UAE VS ओमान – SSC, कोलंबो
- साऊथ आफ्रिका VS कॅनडा – अहमदाबाद
- ऑस्ट्रेलिया VS नामिबिया – दिल्ली
१० फेब्रुवारी (मंगळवार)
- न्यूझीलंड VS USA – चेन्नई
- नेदरलँड्स VS UAE – SSC, कोलंबो
- पाकिस्तान VS अफगाणिस्तान – प्रेमदासा, कोलंबो
११ फेब्रुवारी (बुधवार)
- साऊथ आफ्रिका VS अफगाणिस्तान – मुंबई
- ऑस्ट्रेलिया VS आयर्लंड – चेन्नई
- इंग्लंड VS वेस्ट इंडिज – मुंबई
१२ फेब्रुवारी (गुरुवार)
- श्रीलंका VS ओमान – कॅंडी
- नेपाळ VS इटली – मुंबई
- USA VS नामिबिया – दिल्ली
१३ फेब्रुवारी (शुक्रवार)
- ऑस्ट्रेलिया VS झिम्बाब्वे – प्रेमदासा, कोलंबो
- कॅनडा VS नेदरलँड्स – चेन्नई
- USA VS इटली – कॅंडी
१४ फेब्रुवारी (शनिवार)
- आयर्लंड VS नेपाळ – मुंबई
- इंग्लंड VS बांगलादेश – कोलकाता
- साऊथ आफ्रिका VS UAE – दिल्ली
१५ फेब्रुवारी (रविवार)
- वेस्ट इंडिज VS ओमान – SSC, कोलंबो
- नेपाळ VS नामिबिया – मुंबई
- भारत VS पाकिस्तान – अहमदाबाद
१६ फेब्रुवारी (सोमवार)
- इंग्लंड VS इटली – कोलकाता
- ऑस्ट्रेलिया VS श्रीलंका – कॅंडी
- न्यूझीलंड VS कॅनडा – चेन्नई
- आयर्लंड VS झिम्बाब्वे – कॅंडी
- बांगलादेश VS नेपाळ – मुंबई
- १८ फेब्रुवारी (बुधवार)
- साऊथ आफ्रिका VS UAE – दिल्ली
- पाकिस्तान VS नामिबिया – SSC, कोलंबो
- भारत VS नेदरलँड्स – अहमदाबाद
- वेस्ट इंडिज VS इटली – मुंबई
१९ फेब्रुवारी (गुरुवार)
- श्रीलंका VS झिम्बाब्वे – प्रेमदासा, कोलंबो
- अफगाणिस्तान VS कॅनडा – कॅंडी
- ऑस्ट्रेलिया VS ओमान – कॅंडी
२०–२८ फेब्रुवारी : सुपर ८ स्टेज
सेमीफायनल्स
- सेमीफायनल 1 – कोलकाता / कोलंबो
- सेमीफायनल 2 – मुंबई
फायनल – अहमदाबाद / कोलंबो
८ मार्च (रविवार)