ICC T20 World Cup 2026 Points Table After IND vs PAK Match : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानची जिरवली. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १८ षटकात ११४ धावांवर आटोपला. टीम इंडियाने एकतर्फी मात दिल्यामुळे पाकिस्तानच्या संघाने फक्त दोन गुण गमावले नाही तर निव्वळ धावगतीवर परिणाम झाला असून गुणतालिकेत त्यांना मोठा फटका बसला आहे. हा पराभवामुळे पाकिस्तान सुपर ८ मधील प्रवास खडतर होणार का? जाणून घेऊयात काय आहे यासंदर्भातील समीकरण यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघ टॉपला; त्या पाठोपाठ 'अ' गटात लागतो अमेरिकेचा नंबर
भारतीय संघाने यंदाच्या हंगामातील विजयी हॅटट्रिकसह ६ गुणांची कमाई करत 'अ' गटात अव्वलस्थानी विराजमान होत सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध सर्वोत मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली. परिणामी मायनस नेट रनरेटसह पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत अमेरिकेच्याही मागे पडला आहे. अमेरिकेच्या संघाने दोन सामन्यातील विजयासह ४ गुण कमावत +०.७८८ नेट रनरेटसह भारतीय संघापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.
IND vs PAK : पहिल्या बॉलवर षटकार; बुमराहनं लगेच घेतला बदला! सलमानलाही नाही सोडला (VIDEO)
पाकिस्तानला शेवटची संधी, जर उलटफेर झाला तर गणित बिघडू शकते
पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. १८ फेब्रुवारीला ही लढत नियोजित आहे. जर हा सामना पाकिस्तानच्या संघाने जिंकला तर ते सुपर ८ मध्ये प्रवेश करू शकतात. पण जर या सामन्यात उलटफेर झाला तर पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचीही वेळ येऊ शकते. स्पर्धेतून आउट झालेल्या संघाविरुद्ध पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. जर या सामन्यात उलटफेर झाला तर गतवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा अमेरिकेच्या संघाला सुपर ८ ची लॉटरी लागू शकते. ही शक्यता कमी असली तरी क्रिकेटमध्ये त्यातही पाकिस्तानचा संघ कुणाविरुद्ध नांगी टाकेल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळेच सध्याच्या घडीला ते डेंजर झोनमध्ये आहेत.