Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 WC 2026 : कोलंबो टू कोलकाता! श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तानचे 'पॅकअप'; सेमीफायनलचे ठिकाण बदलले; कारण...

इथं जाणून घेऊयात कोणत्या सेमीफायनलमधील सामना कुठे आणि कधी खेळवण्यात येईल त्यासंदर्भातील सविस्तर माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 23:51 IST

Open in App

ICC T20 World Cup 2026 Pakistan Win Against Sri Lanka But Not Qualify Semi Finals : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ स्पर्धेतील पहिल्या गटातील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने श्रीलंकेला ५ धावांनी पराभूत केले. या विजयासह पाकिस्तानच्या संघाने आपल्या खात्यात न्यूझीलंडच्या बरोबरीनं ३ गुण मिळवले. पण उत्तम धावगतीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाला सेमीच तिकीट मिळाले. पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या २१३ धावांचा पाठलाग पाकिस्तानच्या संघाने या सामन्यात निसटता विजय मिळवला. पण या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने १४८ धावा करताच पाकिस्तानच्या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर झाल्यावर आता सेमीफायलचं ठिकणही बदलले आहे. इथं जाणून घेऊयात कोणत्या सेमीफायनलमधील सामना कुठे आणि कधी खेळवण्यात येईल त्यासंदर्भातील सविस्तर माहिती...

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तानचं 'पॅकअप', आता दोन्ही सेमीफायनल भारतात

सुपर ८ मधील पहिल्या गटातून इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमीफायलसाठी पात्र ठरले आहेत. दुसऱ्या गटातून दक्षिण आफ्रिकेचा संघ पात्र ठरला असून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एक संघ चौथ्या सेमीफायलिस्टच्या रुपात आपली पात्रता सिद्ध करेल. यंदाच्या हंगामातील ५ मार्चला रंगणारा दुसरा सेमीफायनल सामना हा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार हे आधीच ठरले होते. पण ४ मार्चला पहिल्या सेमीफायनलचे  ठिकाण हे श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या सेमीफायलच्या पात्रतेच्या निकषावर अवलंबून होते. या दोन्ही संघातील एक संघ जरी सेमीफायलसाठी पात्र ठरला असता तर पहिली सेमीफायनल कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार होती. पण हे दोन्ही संघ स्पर्धेबाहेर पडल्यामुळे पहिल्या सेमीफायलमधील लढत ही ठरलेल्या तारखेनुसार, कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात येणार असल्याचे चित्रही स्पष्ट झाले.

New Zealand Qualify For Semi : मॅच संपण्याआधीच पाकिस्तान OUT; न्यूझीलंड सेमीसाठी पात्र

फायनलमध्ये चित्रही स्पष्ट

पहिल्या सेमीफायलप्रमाणेच फायनलच्या ठिकाणासंदर्भातली एक समीकरण होते. जर पाकिस्तानचा संघ फायनलसाठी पात्र ठरला तर फायनल लढत कोलंबोच्या मैदानात खेळवण्यात येणार होती. पण आता हा सामनाही ठरल्याप्रमाणे अहमदाबादच्या मैदानात होणार हे देखील सुनिश्चित झाले आहे.  

  • ४ मार्च, २०२६- पहिला सेमीफायल सामना-  ईडन गार्डन्स, कोलकाता
  • ५ मार्च, २०२६- दुसरा सेमीफायल सामना- वानखेडे स्टेडियम, मुंबई 
  • ८ मार्च, २०२६- फायनल, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
English
हिंदी सारांश
Web Title : T20 WC 2026: Pakistan out, semi-finals venue changes to Kolkata!

Web Summary : Pakistan's T20 World Cup exit shifts the first semi-final to Kolkata. England, New Zealand qualify from group one. Final remains in Ahmedabad.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६श्रीलंकापाकिस्तानभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआयसीसी