ICC T20 World Cup 2026 Pakistan beat USA by 32 Runs : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १२ व्या सामन्याआधी USA संघासमोर पाकिस्तानचे पुन्हा बारा वाजणार का? हा मुद्दा चांगलाच चर्चेत राहिला. गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जे करून दाखवल त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी USA चा संघ मैदानात उतरला. पण नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा डाव त्यांच्या अंगलट आला. पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी करत निर्धारित २० षटकात १९० धावा केल्या. त्यानंतर 'स्पिन टू विन फॉर्म्युला' आजमावत अमेरिकेच्या संघाला निर्धारित २० षटकात ८ बाद १५८ धावांवर रोखत ३२ धावांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयासह पाकिस्तानच्या संघाने आपल्या खात्यात ४ गुण जमा करत सुपर ८ मधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. दुसरीकडे सलग दुसऱ्या पराभवामुळे अमेरिकाचा मार्ग खडतर झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोठ्या धावांचा पाठलाग करताना UAS च्या संघातील फक्त चौघांनी गाठला दुहेरी आकडा
पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर शायन जहांगीर याने ३४ चेंडूत ४९ धावांची दमदार खेळी केल्यानंतर शुभमन रांजणे याने ३० चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. याशिवाय मिलिंद कुमार २९ (२२) आणि सलामीवर गॉस १३ (१३) यांच्याशिवाय कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे अमेरिकाचा संघ गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पुनरावृत्ती करण्यास कमी पडला. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेनं पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. या पराभवामुळे त्यांच्यावर साखळी फेरीतच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली होती. पण यावेळी अमेरिकेविरुद्ध स्पिन टू विन फॉर्म्युला आजमावत पाकिस्तानने दोन वर्षांनी त्या पराभवाचा बदला घेत यंदाच्या हंगामता किमान सुपर ८ पर्यंतचा आपला प्रवास निश्चित केला आहे.
कोण आहे Shadley Van Schalkwyk? भारतानंतर पाकिस्तानविरुद्धही कहर; जो ठरला ‘नंबर वन’ गोलंदाज
पाक कडून थांबून बॉलिंग करणाऱ्या गोलंदाजाने लुटली मैफिल
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात अतरंगी शैलीत (थांबून गोलंदाजी) फिरकीपटू उस्मान तारिक याने ४ षटकात २७ धावा खर्च करत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय शादाब खान याने आपल्या फिरकीतील जादू दाखवताना २ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. मोहम्मद नवाझ, अब्रार अहमद आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
Web Summary : Pakistan defeated USA by 32 runs in the T20 World Cup, avenging their previous loss. Pakistan's 'spin to win' strategy proved successful, with Usman Tariq taking 3 wickets. Despite half-centuries from Shayan Jahangir and Shubman Ranjane, the USA fell short, making their path to Super 8 difficult.
Web Summary : पाकिस्तान ने टी20 विश्व कप में यूएसए को 32 रनों से हराया, पिछली हार का बदला लिया। उस्मान तारिक ने 3 विकेट लिए। शयान जहांगीर और शुभमन रांजणे के अर्धशतकों के बावजूद, यूएसए लक्ष्य तक नहीं पहुंच सका, जिससे सुपर 8 का रास्ता मुश्किल हो गया।