Who Is Shadley Van Schalkwyk टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात संयुक्त राज्य अमेरिका (USA) संघाच्या ताफ्यातील शॅडली वॅन शॉकविक याने आपल्या गोलंदाजीची खास छाप सोडली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पॉवर प्लेमध्ये त्याने एकाच षटकात ईशान किशन, तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांची विकेट घेऊन चर्चेत आला होता. अर्शदीपची विकेट घेत त्याने पहिल्या सामन्यात चार विकेट्सचा डावही साधला. त्यानंतर आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कमालीचा योगायोग! दोन्ही संघाविरुद्ध २५ धावांत ४ विकेट्स
अमेरिकेच्या ताफ्यातील या गोलंदाच्या कामगिरीतील कमालीची गोष्ट म्हणजे दोन्ही संघाविरुद्ध त्याने अगदी सेम टू सेम कामगिरी करत यंदाच्या हंगामात २ सामन्यानंतर सर्वाधिक ८ विकेट्स घेत तो नंबर वन गोलंदाज ठरला आहे. दोन्ही सामन्यात २५ धावा खर्च करत त्याने ४ विकेट्सचा डाव साधला आहे. इथं जाणून घेऊयात अमेरिकेच्या ताफ्यातील पॉवरफुल गोलंदाजाबद्दलची खास गोष्ट
T20 World Cup स्पर्धेत 'लिंबू टिंबू' संघाविरुद्ध सर्वात महागडे षटक टाकणारे गोलंदाज
कोण आहे शॅडली वॅन शॉकविक?
शॅडली वॅन शॉकविक या जन्म ५ ऑगस्ट १९८८ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथे झाला. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस याने ज्या विनबर्ग बॉईज हायस्कूलमधून शिक्षण घेतले त्याच शाळेत तोही शिकला आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळले असून, २००८ मध्ये वेस्टर्न प्रोव्हिन्स संघाचे प्रतिनिधित्व केले. २०२० नंतरच्या काळात तो अमेरिकेत स्थायिक झाला आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी USA संघाचा सदस्यही होता. मेजर लीग क्रिकेट (MLC) मध्ये तो लॉस एंजेलिस नाइट रायडर्सकडून खेळतो, तर ILT20 स्पर्धेत तो अबू धाबी नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करतो.
ICC च्या नियमित सदस्य देशांविरुद्ध USA चे सर्वोत्तम गोलंदाजी आकडे (T20I)
- ४/२५ – शॅडली वॅन शॉकविक विरुद्ध भारत, वानखेडे, २०२६
- ४/२५* – शॅडली वॅन शॉकविक विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो (सिंहलीज स्पोर्ट्स क्लब), २०२६
- ३/२५ – अली खान विरुद्ध बांगलादेश, ह्यूस्टन, २०२४
- ३/३० – नोश्टुश केंजिगे विरुद्ध पाकिस्तान, डॅलस, २०२४
- ३/३३ – सौरभ नेत्रावळकर विरुद्ध आयर्लंड, लॉडरहिल, २०२१