T20 World Cup 2026, England Into Semi Final : हॅरी ब्रूकची सेंच्युरी! पाकला पराभूत करत इंग्लंड ठरली सेमीफायनल गाठणारी पहिली टीम

या पराभवानंतर पाकिस्तानचे सेमीच समीकरण आता अवघड झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 22:39 IST2026-02-24T22:37:20+5:302026-02-24T22:39:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 PAK vs ENG Harry Brook Century England Beat Pakistan And First Team To Enter Semi Final | T20 World Cup 2026, England Into Semi Final : हॅरी ब्रूकची सेंच्युरी! पाकला पराभूत करत इंग्लंड ठरली सेमीफायनल गाठणारी पहिली टीम

T20 World Cup 2026, England Into Semi Final : हॅरी ब्रूकची सेंच्युरी! पाकला पराभूत करत इंग्लंड ठरली सेमीफायनल गाठणारी पहिली टीम

ICC T20 World Cup 2026 Harry Brook Century England Beat Pakistan  To Enter Semi Final : हॅरी ब्रूकच्या विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर पल्लेकेलेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पाकिस्ताला पराभूत करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. इंग्लंड यंदाच्या हंगामात सेमीफायनल गाठणारी पहिली टीम ठरली आहे. सलमान आगाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्या १६४ धावा करत इंग्लंडच्या संघासमोर १६५ धावांचे टार्गेट सेट केले होते. संघाची खराब सुरुवात झाल्यावर इंग्लंडच्या कर्णधाराने एकट्याने खिंड लढवत शतकी खेळीसह संघाला सेमीच तिकीट मिळून देण्यात मोलाचा वाटा उचलला. या पराभवानंतर पाकिस्तानचे सेमीच समीकरण आता अवघड झाले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

आता एका जागेसाठी तिघांत स्पर्धा

इंग्लंडच्या संघाने सुपर ८ मधील सलग दुसऱ्या विजयासह सेमीचं तिकीट बूक केल्यावर दुसऱ्या गटात आता पाकिस्तानसह यजमान श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील एका जागेसाठी तगडी स्पर्धा असणार आहे. या गटात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे दोन्ही संघ प्रत्येकी १-१ गुण मिळवून सेमीच्या शर्यतीत आहेत. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर श्रीलंकेनं उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर ते या गटातून सेमीच तिकीट बूक करू शकतील. 

ICC T20 WCup 2026 Harry Brook Century : पाकिस्तान विरुद्ध हॅरी ब्रूकची विक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणार...

पाकिस्तानकडून साहिबजादाची अर्धशतकी खेळी

श्रीलंकेतील कोलंबो येथील पल्लेकेलेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना साहिबजादाने ४५ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६३ धावांच्या खेळी केली. बाबर आझम पुन्हा एकदा चांगली सुरुवात मिळाल्यावर २४ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. फखर झमान याने १६ चेंडूत केलेल्या २५ धावा आणि शादाब खान याने ११ चेंडूत २३ धावांची उपयुक्त खेळी केल्यामुळे पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्सच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून लायम डॉसन याने सर्वाधिक ३ तर जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हर्टन यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. आदिल रशीद यानेही एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. 

शाहीन शाह आफ्रिदीचा कहर, सुरुवातीलाच इंग्लंडला दिले धक्क्यावर धक्के 

पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने पहिल्या चेंडूवर विकेट गमावली. शाहीन शाह आफ्रिदीनं फिल सॉल्टला खातेही न उघडता तंबूचा रस्ता दाखवला. दुसऱ्या षटकात आफ्रिदीनं जोस बटलरच्या रुपात इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. एवढेच नाही तर जेकब बेथेलही त्याच्या गोलंदाजीवर फसला. मग पिक्चमध्ये आला तो उस्मान तारीक.  त्याने टॉम बॅन्टनला माघारी धाडले. इंग्लंडच्या संघाने ५८ धावांवर पहिल्या चार विकेट्स गमावल्या होत्या. 

हॅरी ब्रूकची सेंच्युरी! त्याला सॅम कुरेन अन् विल जॅक्सन दिली उत्तम साथ अन्...

संघ अडचणीत असताना कर्णधार हॅरी ब्रूक तग धरून मैदानात नुसता उभा राहिला नाही तर त्याने आपल्या फलंदाजीतील खास नजराणा पेश केला. सॅम कुरनेच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी फक्त २८ चेंडूत ४५ धावांची भागीदारी रचल्यावर ब्रूक आणि विल जॅक्स जोडी जमली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ३१ चेंडूत ५२ धावांची भागीदारी रचत पाकिस्तानी गोलंदाजांचे खांदे पाडले. शतक झळकावल्यावर हॅरी ब्रूक माघारी फिरला.तो बाद झाल्यावर पाकिस्तानच्या संघाने काही विकेट्स मिळवल्या. पण शेवटी इंग्लंडने २ विकेट्स राखून विजय निश्चित करत  सेमीच तिकीट पक्के केले. 

Web Title : इंग्लैंड टी20 विश्व कप के सेमीफाइनल में, ब्रूक का शतक!

Web Summary : हैरी ब्रूक के शतक की बदौलत इंग्लैंड ने पाकिस्तान को हराकर टी20 विश्व कप के सेमीफाइनल में जगह बनाई। ब्रूक के शानदार प्रदर्शन और महत्वपूर्ण साझेदारियों ने शुरुआती झटकों के बावजूद जीत सुनिश्चित की।

Web Title : England reach T20 World Cup semi-final, Brook's century seals victory!

Web Summary : Harry Brook's century propelled England to the T20 World Cup semi-finals, defeating Pakistan in a thrilling match. England is the first team to qualify after Brook's stellar performance and crucial partnerships secured the win despite early setbacks.