NZ vs UAE, T20 World Cup 2026 : चेपॉकवर मार्क चॅपमनची हवा; डॅरिल मिचेलच्या साथीनं 'अलीशा'न खेळीला लावला ब्रेक

मुहम्मद वसीमचं नाबाद अर्धशतक, UAE नं उभारली टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपली विक्रमी धावसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:24 IST2026-02-10T17:22:53+5:302026-02-10T17:24:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 NZ vs UAE 11th Match Sensational Relay Catch From Mark Chapman And Daryl Mitchell Near Boundary Rope End Alishan Sharafu's Inning After Fifti Watch Video | NZ vs UAE, T20 World Cup 2026 : चेपॉकवर मार्क चॅपमनची हवा; डॅरिल मिचेलच्या साथीनं 'अलीशा'न खेळीला लावला ब्रेक

NZ vs UAE, T20 World Cup 2026 : चेपॉकवर मार्क चॅपमनची हवा; डॅरिल मिचेलच्या साथीनं 'अलीशा'न खेळीला लावला ब्रेक

NZ vs UAE 11th Match Sensational Relay Catch From Mark Chapman And Daryl Mitchell : न्यूझीलंड विरुद्ध युएई यांच्यात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ११ वा चेन्नईतील चेपॉकच्या मैदानात रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यान नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना UAE च्या संघाने अवघ्या १२ धावांवर पहिली विकेट गमावली. पण त्यानंतर अलीशान शराफू आणि कर्णधार मुहम्मद वसीम  जोडी जमली. या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर UAE च्या संघाने निर्धारित २० षटकात करत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील संघाची सर्वोच्च धावंसख्या उभारली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

२०० चा आकडा होता दृष्टिक्षेपात असताना मार्क चॅपमन अन् डॅरिल मिचेलची कमाल अन्...

६ विकेट्सच्या बदल्यात १७३ धावा केल्या. ही UAE ची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. अलीशान शराफू शेवटपर्यंत टिकला असता तर UAE च्यासंघाने या सामन्यात २०० धावांचा आकडाही गाठला असता. पण मार्क चॅपमन आणि डॅरिल मिचेल या दोघांनी सीमारेषेवर कमालीचा ताळमेळ दाखवत त्याला तंबूचा रस्ता दाखवला अन् UAE ची धावगती मंदावली.

T20 World Cup 2026 Stunning Catch: सीमारेषेवर हेयलिगरचा 'सुपरमॅन' अवतार; मार्करमची वादळी खेळी थांबली (VIDEO)

चेपॉकवर मार्क चॅपमनची हवा, डॅरिल मिचेलच्या साथीनं अलीशान खेळीला लावला ब्रेक


UAE च्या संघाने १५ व्या षटकात १ विकेट्सच्या मोबदल्यात ११९ धावा केल्या होत्या. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याच्या गोलंदाजीवर अलीशान शराफू याने मोठा फटका खेळला. सीमारेषेवर मार्क चॅपमन याने हवेत उडी मारून चेंडू डॅरिल मिचेलकडे उचांवत स्वत: सीमारेषेबाहेर पडला. डॅरिल मिचेलनं आपल्या सहकाऱ्याची मेहनत सार्थक लावत हा कॉच पूर्ण केला. अलीशान शराफूची ही विकेट सँटनरच्या आणि झेल डॅरिल मिचेलच्या नावे झाला असला तरी या विकेटचं खरं श्रेय हे मार्क चॅपमनलाच जाते.

मुहम्मद वसीमचं नाबाद अर्धशतक

अलीशान शराफू याने ४७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या  मदतीने ५५ धावांची खेळी केली. तो माघारी फिरल्यावर कर्णधार मुहम्मद वसीम  याने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटाकरांच्या मदतीने नाबाद ६६ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर १७३ धावा लावल्या. न्यूझीलंडच्या संघाकडून मॅट हेन्रीनं सर्वाधिक २ तर जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या नावे केली. 


 

Web Title : NZ vs UAE: चैपमैन का कमाल, मिचेल का साथ, अलीशान की पारी थमी।

Web Summary : न्यूजीलैंड बनाम यूएई मैच में, यूएई ने 173/6 रन बनाए, जो उनका टी20 विश्व कप का सर्वोच्च स्कोर है, जिसका नेतृत्व अलीशान शराफू (55) और मुहम्मद वसीम (66*) ने किया। चैपमैन और मिचेल के रिले कैच ने शराफू को आउट किया, जिससे यूएई की गति धीमी हो गई। हेनरी ने न्यूजीलैंड के लिए 2 विकेट लिए।

Web Title : NZ vs UAE: Chapman's brilliance, Mitchell's support halts Alishan's innings.

Web Summary : In the NZ vs UAE match, UAE scored 173/6, their highest T20 World Cup score, led by Alishan Sharafu (55) and Muhammad Waseem (66*). Chapman and Mitchell's relay catch dismissed Sharafu, slowing UAE's momentum. Henry took 2 wickets for New Zealand.