ICC T20 World Cup 2026 NEP vs ENG 5th Match :मुंबईतील वानखेडेच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध नेपाळ यांच्यात रंगलेला सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाला. इंग्लंडने दिलेल्या १८५ धावांचा पाठलाग करताना नेपाळचा कर्णधार रोहित कुमार पौडेल आणि दीपेंद्र सिंह ऐरी यांनी दमदार भागीदारीच्या जोरावर संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. ही जोडी माघारी फिरल्यावर सामन्याची सूत्रे लोकेश बामनं आपल्या हाती घेतली. पण शेवटी अखेरच्या षटकात १० धावांचा बचाव करत सॅम कुरेन याने नेपाळच्या तावडीतून इंग्लंडची सुटका केली. नेपाळच्या संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्या १८० धावांपर्यंत पोहचला. अवघ्या ४ धावांनी नेपाळच्या संघाची ऐतिहासिक विजयाची संधी हुकली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात १८४ धावा करत नेपाळसमोर १८५ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना धावफलकावर ५० धावा लागण्याआधी नेपाळच्या संघाला दोन धक्के बसले. पण या परिस्थितीतही संघ डगमगला नाही. नेपाळचा कर्णधार रोहित कुमार पौडेल आणि दीपेंद्र सिंह ऐरी यांनी दमदार भागीदारी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ चेंडूत ८२ धावांची भागीदारी रचत नेपाळच्या आशा पल्लवित केल्या.
सॅम कुरेन यानं फोडली सेट झालेली जोडी, तोच शेवटच्या षटकात इंग्लंडच्या मदतीला धावला
रोहित कुमार पौडेल आणि दिपेंद्र सिंग एरी ही जोडी इंग्लंडच्या संघाला जोरदार धक्का देण्याच्या इराद्यानेच खेळत होती. पण सॅम कुरेन याने ही जोडी फोडली. त्याने दिपेंद्रला झेलबाद केले. तो २९ चेंडूत ४४ धावांची दमदार खेळी करून माघारी फिरला. लायम डॉसन याने रोहिची विकेट घेत इंग्लंडला मोठा दिलासा दिला. पण त्यानंतर लोकेश बामनं आपल्या फलंदाजीतील धमक दाखवत नेपाळला विजयाच्या अगदी जवळ घेऊन जाणारी खेळी केली. त्याने जोर लावला, पण अखेरच्या षटकात १० धावांचा बचाव करण्यासाठी सॅम कुरेन पुन्हा एकदा इंग्लंडच्या मदतीला धावला. लोकेश बाम याने २० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. अखेरच्या षटकात १० धावांचा बचाव करत इंग्लंडची लाज राखणाऱ्या सॅम कुरेन याने १ षटकात २७ धावा खर्च करून एक विकेट घेतली.
Web Summary : A thrilling England-Nepal match saw Nepal nearly chase down 185. Rohit Paudel and Dipendra Airee shone, then Lokesh Baman took charge. Sam Curran's final over secured England's narrow 4-run victory, denying Nepal a historic win.
Web Summary : इंग्लैंड-नेपाल के रोमांचक मुकाबले में नेपाल 185 रनों का पीछा करते हुए लगभग जीत गया था। रोहित पौडेल और दीपेंद्र ऐरी चमके, फिर लोकेश बामन ने कमान संभाली। सैम कुरेन के आखिरी ओवर ने इंग्लैंड को 4 रनों से जीत दिलाई, जिससे नेपाल का ऐतिहासिक जीत का सपना टूट गया।