Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NAM, T20 World Cup 2026 : बुमराहचा खतरनाक यॉर्कर; वेदनांनी व्याकूळ झाला ईशान किशन, नेट्समध्ये नेमकं काय घडलं?

 ईशान किशनची भूमिका महत्वाची, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 23:50 IST

Open in App

Ishan Kishan Had A Brief Injury Scare After Jasprit Bumrah's Toe-Crushing Yorker : गत चॅम्पियन टीम इंडियाने टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील मोहिमेला अमेरिकेविरुद्ध विजयाने सुरुवात केली. मुंबईतील यशानंतर आता भारतीय संघ दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत-नामिबिया सामना रंगणार आहे. अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत संभ्रम असतानाच नेट प्रॅक्टिसदरम्यान ईशान किशनला चेंडू लागल्याने क्षणभर चिंतेचं वातावरण निर्माण झालं. दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊयात.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बुमराहचा खतरनाक यॉर्कर, ईशान किशन वेदनेनं व्याकूळ झाल्याचं दिसला

अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकलेला जसप्रीत बुमराह दुसऱ्या सामन्यात पुनरागमनासाठी सज्ज आहे. नेट्समध्ये त्याने कसून सराव केला. याचवेळी त्याने टाकलेला एक अचूक आणि खतरनाक यॉर्कर खेळताना ईशान किशनचा अंदाज चुकला आणि चेंडू त्याच्या डाव्या पायाच्या बोटावर आदळला. वेदनांनी व्याकूळ झालेला भारताचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज काही क्षणांसाठी सरावातून बाहेर गेला. या घटनेमुळे भारतीय ताफ्यात दुखापतीचं सावट निर्माण झाले.

Abhishek Sharma Discharged From Hospital : अभिषेक शर्माला डिस्चार्ज! नामिबियाविरुद्ध खेळणार? तिलक वर्मा म्ह...

...अन् चिंता मिटली

भारतीय संघाच्या सराव सत्रात बुमराहचा चेंडू लागल्यावर ईशान किशनची हावभाव पाहून काहींच्या मनात तो पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला. पण हा सर्व प्रकार घडल्यावर ईशान किशन पुन्हा फलंदाजीला आला. Revsportz च्या वृत्तानुसार, त्याने पुन्हा नेट्समध्ये येऊन जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या गोलंदाजीवर सराव केला. हे वृत्त टीम इंडियात दुखापतीचं टेन्शन दूर करणारे असेच आहे. BCCI नं दुखापतीसंदर्भात  कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे तो नामिबियाविरुद्ध भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करेल, अशी अपेक्षा आहे.

   ईशान किशनची भूमिका महत्वाची

अभिषेक शर्मा नामिबियाविरुद्ध खेळणार की नाही, याबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. तिलक वर्मानं पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक शर्माला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याला तो संघात जॉईनही झाला असून त्याला खेळवायचं की नाही त्यासंदर्भातील निर्णय टॉस आधी घेण्यात येईल. या संभ्रमाच्या परिस्थितीत ईशान किशनची जबाबदारी आणखी वाढते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bumrah's Yorker Hits Ishan Kishan During Nets; Injury Scare?

Web Summary : During net practice for the Namibia match, Ishan Kishan was hit by a Jasprit Bumrah yorker, causing concern. He resumed batting, easing injury fears. His role is crucial amidst uncertainty about Abhishek Sharma's availability.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयजसप्रित बुमराहइशान किशनभारतीय क्रिकेट संघ