Sanju Samson Starts With A Six ICC T20 World Cup Debut : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नामिबियाविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याला अखेर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. संजू सॅमसन हा रोहित २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचाही भाग होता. पण गत हंगामात त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. बाकावर बसूनच त्याला टी-२० वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग लागला.
अखेर पहिली संधी मिळाली, पण...
यंदाच्या हंगामासाठी तो सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती होता. पण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील फ्लॉप शोनंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याचा पत्ता कट झाला. ईशान किशनने त्याची जागा घेतली. नामिबियाविरुद्ध अभिषेक शर्मा अनफिट असल्यामुळे संजूला संधी मिळाली आणि वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना खेळण्यासाठी तो मैदानात उतरला. पण चांगली सुरुवात मिळाल्यावर त्याने विकेट फेकली.
नामिबियाविरुद्ध षटकार-चौकारांची आतषबाजी केली, पण...
नामिबियाविरुद्ध टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळताना तिसऱ्या चेंडूवर संजून षटकार मारून खाते उघडले. संधीचं सोनं करण्याचे संकेत त्याने दिले. पण भारताच्या डावातील दुसऱ्याच षटकात बेन शिकोंगोनं त्याची विकेट घेतली. या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन षटकार मारल्यावर पाचव्या चेंडूवर चौकार मारला होता. अखेरच्या चेंडूवरही संडूनं मोठा फटका खेळला अन् ८ चेंडूत २२ धावांवर त्याच्या खेळीला ब्रेक लागला.
Web Summary : Sanju Samson debuted in the T20 World Cup against Namibia, hitting a six to start. Despite a promising start with aggressive hitting, he lost his wicket cheaply after scoring 22 runs off 8 balls, failing to capitalize on the opportunity.
Web Summary : संजू सैमसन ने नामीबिया के खिलाफ टी20 विश्व कप में डेब्यू किया, छक्के से शुरुआत की। आक्रामक हिटिंग के बावजूद, 8 गेंदों में 22 रन बनाकर विकेट गंवा दिया, और मौके का फायदा उठाने में असफल रहे।