T20 World Cup 2026, IND vs NAM: अभिषेकच्या जागी संजूला संधी, बुमराहचं कमबॅक! सूर्यानं कुणाला बसवलं बाकावर?

अभिषेक शर्माच्या जागी संजूला संधी, तो वर्ल्ड कपमध्ये पहिलाच सामना खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:43 IST2026-02-12T18:42:03+5:302026-02-12T18:43:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 IND vs NAM 18th Match Namibia Won Toss And Opted To Field India Captain Suryakumar Yadav Say Abhishek Not Fine Sanju Samson And Jasprit Bumrah Replace Siraj Playing 11 | T20 World Cup 2026, IND vs NAM: अभिषेकच्या जागी संजूला संधी, बुमराहचं कमबॅक! सूर्यानं कुणाला बसवलं बाकावर?

T20 World Cup 2026, IND vs NAM: अभिषेकच्या जागी संजूला संधी, बुमराहचं कमबॅक! सूर्यानं कुणाला बसवलं बाकावर?

ICC T20 World Cup 2026 India vs Namibia, 18th Match : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमर भारतीय संघ नामिबिया विरुद्ध टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यातील दमदार विजयासह भारतीय संघाला गुणतालिकेत पाकिस्तानला मागे टाकत 'अ' गटात अव्वलस्थानावर पोहचण्याची संधी आहे. दुसरीकडे नामिबियासमोर टीम इंडियाचे मोठे आव्हान असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

चांगली कामगिरी करूनही तो बाकावर! बुमराहचं कमबॅक संजूलाही संधी

नामिबियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक गमावली असली तरी सूर्यकुमार यादवला जे हवं तेच झाले. नाणेफेकीनंतर सूर्यकुमार यादवनं आम्हाला पहिल्यांदा फलंदाजीच करायची होती, असे सांगितले. यावेळी त्याने अभिषेक शर्माची तब्येत अजूनही ठिक नाही. त्यामुळे त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आल्याचे स्पष्ट केले. याशिवाय जसप्रीत बुमराह फिट होऊन परतला असून मोहम्मद सिराजला बाकावर बसवण्यात आल्याचे त्याने सांगितले. बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजनं पहिल्या सामन्यात दमदार गोलंदाजी केली होती. पण त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ आली आहे.  

धोनीचा बायोपिक पाहिला अन् पाकिस्तानी सेल्समन नोकरी सोडून झाला क्रिकेटर, कोण आहे तो?

भारत (प्लेइंग इलेव्हन):

संजू सॅमसन, ईशान किशन (विकेट किपर बॅटर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

नामिबिया (प्लेइंग इलेव्हन):

लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (सी), जेजे स्मित, झेन ग्रीन (डब्ल्यू), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो

Web Title : भारत बनाम नामीबिया: संजू शामिल, बुमराह की टी20 विश्व कप में वापसी!

Web Summary : भारत दिल्ली में टी20 विश्व कप में नामीबिया से भिड़ेगा। संजू सैमसन और जसप्रीत बुमराह टीम में हैं। नामीबिया ने पहले गेंदबाजी करने का विकल्प चुना, जिससे भारत को तालिका में शीर्ष पर पहुंचने के लिए चुनौती मिली।

Web Title : India vs Namibia: Samson in, Bumrah returns for T20 World Cup!

Web Summary : India faces Namibia in the T20 World Cup at Delhi. Sanju Samson and Jasprit Bumrah are in the squad. Namibia chose to bowl first, presenting a challenge for India to top the table.