Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs ZIM : आधीच 'नेट रनरेट'चं कोडं! त्यात टीम इंडियासमोर नवा प्रश्न! रिंकूच्या जागी कोण? ही दोन नावे चर्चेत

यंदाच्या हंगामातील जेतेपदाचा दावेदार 'करो वा मरो'च्या परिस्थितीत अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:43 IST

Open in App

ICC T20 World Cup 2026 If Rinku Singh Wont Available For Zimbabwe Match Then Who Will Replace Him : आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत सुपर ८ फेरीतल गुरुवारी, २६ फेब्रुवारीला भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना रंगणार आहे. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्याआधी आधीच अडचणीत असलेल्या टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे फिनिशर रिंकू सिंह याने संघाची साथ सोडून ग्रेटर नोएडाची वाट धरली आहे. त्यामुळे झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात तो खेळणं मुश्कील आहे. जर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नसेल तर त्याची जागा कोण घेणार? हा तिढा टीम इंडियाला सोडवावा लागेल. इथं जाणून घेऊयात त्याच्या जागी कोणाला मिळू शकते संधी? यासंदर्भात सविस्तर

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा! 

उप-कर्णधार ठरू शकतो पहिली पसंती

रिंकूच्या जागी भारतीय संघाकडे दोन उत्तम पर्याय आहेत. भारताचा उप कर्णधार अक्षर पटेल हा त्याचा पहिला पर्याय ठरू शकतो. तांत्रिक खेळाच्या प्रयोगात टीम इंडियाने आपल्या  उप कर्णधाराला बाकावर बसवले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवून टीम इंडियाने मोठी चूक केली, असा सूर उमटला होता. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात रिंकूच्या जागी त्याचा विचार केला जाऊ शकतो. चेन्नईची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असल्यामुळे भारतासाठी हा पर्याय सर्वोत्तम ठरु शकतो.  

VIDEO : मिलरच्या अवतीभवती फिरताना दिसली अन्.... आरजे Princy Parikh नं शेअर केला भयावह अनुभव

संजूच्या नावाचाही देखील होऊ शकतो विचार

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर संजू सॅमसनला संघात घेण्याच्या हालचाली दिसू लागल्या आहेत. रिंकूच्या जागी त्याला फिट करण्याचा एक पर्याय टीम इंडियासमोर असेल. रिंकूच्या जागी अक्षरला पसंती दिली तर वॉशिंग्टनच्या जागी संजूला आजमावण्याचा डावही टीम इंडियाकडून खेळला जाऊ शकतो. संघ व्यवस्थापन नेमकां संघात काय बदल करणार ते पाहण्याजोगे असेल. 

यंदाच्या हंगामातील जेतेपदाचा दावेदार 'करो वा मरो'च्या परिस्थितीत अडकला

सुपर ८ फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघासाठी उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धची लढत ही 'करो वा मरो'ची असेल. नेट रन रेटचा फॅक्टर आला तर तिथं गेम होऊ नये, याचा विचार करून भारतीय संघाला सामना जिंकायचा आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : India vs. Zimbabwe: Who replaces Rinku Singh? Two names discussed.

Web Summary : With Rinku Singh unavailable, India faces a selection dilemma for the Zimbabwe match. Axar Patel and Sanju Samson are potential replacements, considering Chennai's pitch conditions. India needs to win this crucial match.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत-झिम्बाब्वेरिंकू सिंगसंजू सॅमसनअक्षर पटेल