Join us
Daily Top 2Weekly Top 5

T20 World Cup 2026 : भारत-अमेरिका सामना लाईव्ह आणि मोफत! कधी, कुठे, कसा पाहायचा?

सलामीच्या लढती आधी टीम इंडियाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:50 IST

Open in App

मुंबईतील वानखेडेच्या मैदानातून भारतीय संघ T20 वर्ल्ड कप 2026 मोहिमेची सुरुवात करणार आहे.  सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या संघातील फक्त चार खेळाडू अमेरिकेत जन्मलेले आहेत. उर्वरित खेळाडू भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका येथील आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सलामीच्या लढती आधी टीम इंडियाला धक्का

गत चॅम्पियन टीम इंडियाकडून ईशान किशनवर सर्वांच्या नजरा असतील. तो अभिषेक शर्मा याच्यासोबत डावाची सुरुवात करेल, अशी शक्यता आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसन ऐवजी ईशान किशनला संधी मिळण्याची हिंट सराव सामन्यात मिळाली होती. या सामन्याआधी टीम इंडियाला हर्षित राणाच्या रुपात मोठा धक्का बसला असून युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे बाहेर पडला असून मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आले आहे. इथं एक नजर टाकुयात कुठं आणि कधी रंगणार भारत-अमेरिका यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना? क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद कसा घेऊ शकतील? यासंदर्भातील सविस्तर माहिती

ICC Men's T20 World Cup 2026 : नेदरलँड्सची एक चूक अन् सामना फिरला; पाकिस्तानची रडत खडत विजयी सलामी

सूर्या पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत करणार भारतीय संघाचे नेतृत्वअमेरिकेचा खेळाडू हरमीत सिंग याने २०१५ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईकडून सूर्यकुमार यादवसोबत सहा सामने खेळले आहेत. 2024 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये हे दोघे एकमेकांविरुद्ध आमनेसामने आले होते. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने सामना जिंकवणारे अर्धशतक झळकावले होते. यावेळी सूर्या नेतृत्वातील कर्तृत्व दाखवून देण्यासाठी मैदानात उतरेल. 

भारत विरुद्ध अमेरिका T20 वर्ल्ड कप २०२६ सामना कधी आणि कुठं रंगणार?

भारत विरुद्ध अमेरिका T20 वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सामना शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) खेळवला जाणार आहे. मुंबईतील वानखेडेच्या मैदानात हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघातील कर्णधार अर्धा तास अगोदार नाणेफेकीसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल.

सामना लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध अमेरिका सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय जिओहॉटस्टारवर क्रिकेट चाहत्यांना लाईव्ह स्टिमिंगच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेता येईल.

मोफत सामना कसा पाहता येईल? 2026 T20 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध अमेरिका (India vs USA) सामना ICC.TV वर मोफत लाईव्ह स्ट्रीम पाहता येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : T20 World Cup 2026: India vs USA Live, Free Streaming Details

Web Summary : India begins its T20 World Cup 2026 campaign against the USA in Mumbai. Suryakumar Yadav leads the team. The match will be held on February 7th at Wankhede Stadium and will be broadcast on Star Sports and JioHotstar. Free live streaming is available on ICC.TV.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार यादवइशान किशनमोहम्मद सिराजजसप्रित बुमराहअभिषेक शर्मा