Rohit Sharma Gave Golden Advice To Sanju Samson When He Was Dropped Video Viral : टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात होण्याआधी संजू सॅमसन हा सलामवीरीच्या रुपात पहिली पसंती होता. पण न्यूझीलंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिकेनंतर गणित बिघडलं. गत हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय वर्ल्ड कप विजेत्या संघाचाही तो भाग होता. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. यंदाच्या हंगामातही संजू सॅमसनवर पुन्हा एकदा तीच वेळ येणार का? असे चित्र निर्माण झाले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहितची जादूची झप्पी, संजूला दिलासा देताना तो जे बोलला ते खरं ठरलं
पण यंदाच्या हंगामात नामिबियाविरुद्दच्या सामन्यात त्याला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पणाची संधी मिळाली. झिम्बाब्वेविरुद्धही तो खेळला. पण तिसऱ्या सामन्यात त्याने संधीचं खऱ्या अर्थानं सोनं केलं. वेस्ट इंडिज विरुद्धच्या ९७ धावांच्या दमदार खेळीनंतर रोहित शर्मा आणि संजूचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदाच्या हंगामातील वानखेडेच्या मैदानातील सलामीच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हमधून आउट झालेल्या संजूला रोहित दिलासा देताना दिसला होता. "कसा आहेस? दुखी होऊ नकोस भाऊ. स्पर्धा मोठी आहे, कधीही संधी मिळू शकते." ती गोष्ट खरीही ठरली. पण तुम्हाला माहितीये का? त्या एका गोष्टीची खंत संजूच्या मनात अजूनही कायम आहे. इथं जाणून घेऊयात सध्याच्या घडीला जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात संजू आणि रोहित यांच्यातील दिसलेल्या खास बॉन्डिंगच्या पलिकडची ती खास गोष्ट
वर्षांनुवर्षे MS धोनीच्या आयकॉनिक षटकारावर वाद; आता संजूच्या खंबीर खेळीवरील 'गंभीर' वक्तव्य चर्चेत
...अन् टी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील फायनल खेळण्याची संधी हुकली
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गत हंगामात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती. बार्बाडोसच्या मैदानात रंगलेल्या फायनलमध्ये संजू सॅमसनला संधी मिळणार हे जवळपास निश्चित होते. त्याला तयार राहण्यासाठी सांगण्यात आले होते. पण शेवटच्या १० मिनिटात प्लॅन बदलला. भारतीय संघाने कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळीही रोहित शर्मानं केरळच्या स्टार बॅटरची समजूत घातली होती. नाणेफेकीला जाण्याआधी १० मिनिटे त्याने संजूसोबत चर्चा केली. बाहेर बसवण्यामागचं त्याला स्पष्टीकरण दिले होते.
संजू सॅमसनने बोलून दाखवली होती 'ती' खंत
एका मुलाखतीत संजूने याच क्षणाचा उल्लेख करत म्हटले होते की, "वर्ल्ड कप फायनलसारख्या मोठ्या सामन्यापूर्वी जो खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही, त्याच्यासोबत कर्णधार १० मिनिटे घालवतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या क्षणी रोहितने माझ्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली फायनल खेळता आली नाही, ही खंत आयुष्यभर राहील."
Web Summary : Rohit Sharma's words to Sanju Samson, when dropped, proved true as Sanju debuted in T20 World Cup. Despite playing, Sanju regrets missing the World Cup final under Rohit's captaincy, despite Rohit's support.
Web Summary : रोहित शर्मा की संजू सैमसन को दी गई सलाह सच हुई क्योंकि संजू ने टी20 विश्व कप में पदार्पण किया। खेलने के बावजूद, संजू को रोहित की कप्तानी में विश्व कप फाइनल में चूकने का अफ़सोस है, बावजूद रोहित के समर्थन के।