‘नो फॅमिली’ नियम कायम! BCCI नं भारतीय संघ व्यवस्थापनाची 'ती' मागणी फेटाळली; पण…

भारतीय संघ व्यवस्थापनाची विनंती, अन् बीसीसीआयनं दिला नवा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:01 IST2026-02-10T15:48:53+5:302026-02-10T16:01:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 BCCI Sticks To Its Policy Bars Players From Staying With Families | ‘नो फॅमिली’ नियम कायम! BCCI नं भारतीय संघ व्यवस्थापनाची 'ती' मागणी फेटाळली; पण…

‘नो फॅमिली’ नियम कायम! BCCI नं भारतीय संघ व्यवस्थापनाची 'ती' मागणी फेटाळली; पण…

T20 वर्ल्ड कप 2026 दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)  भारतीय खेळाडूंच्या एका मागणीला थेट नकार दिला आहे. ICC च्या या मोठ्या स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंना आपल्या कुटुंबासह प्रवास करण्याची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापाने केला होता, पण बीसीसीआयने नियम न मोडता आपली भूमिका ठाम ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

थेट बंदी नाही, मग का नाकारली परवानगी?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने खेळाडूंसाठी नवी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार. खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबियातील सदस्य किती दिवस राहू शकतात, यासंदर्भातही खास तरतुद केली होती. या नियमावलीनुसार, T20 वर्ल्ड कप मोहिमेदरम्यान भारतीय खेळाडूंना त्यांच्या कुटुंबासोबत राहण्याची परवानगी मिळणार नाही.  बीसीसीआयने भारतीय संघातील खेळाडूंना कुटुंबियांना सोबत प्रवास करण्यासंदर्भात थेट बंदी घातलेली नाही. पण नियामवलीनुसार, ते शक्य नाही.

ICC चा ‘तो’ मास्टरस्ट्रोक आणि पाकिस्तान भारताविरुद्ध खेळण्यास झाला तयार, नेमकं काय घडलं?

नियम मोडायचा नाही, BCCI आपल्या भूमिकेवर ठाम  

बीसीसीआयने खेळाडूंसाठी लागू केलेल्या कुटुंबियांनासोबत नेण्यासंदर्भातील नियमानुसार, खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांना (पार्टनर आणि मुले) जास्तीत जास्त १४ दिवसांसाठी सोबत ठेवण्याची परवानगी दिली जाते. ४५ दिवसांच्या परदेशी दौऱ्यादरम्यान ही परवानगी दिली जाते. पण यावेळी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा ही भारतीय मैदानात आहे. त्यातही स्पर्धा महिन्याभराची असल्यामुळे बीसीआयने खेळाडूंसाठी संघ व्यवस्थापाने कुटुंबियांसोबत प्रवास करण्यासाठी मागितलेली परवानगी नाकारण्यात आली आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाची विनंती, अन् बीसीसीआयनं दिला नवा पर्याय

इंडियन एक्स्प्रेसने BCCI च्या सूत्राच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार,  भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाने संघातील खेळाडू पत्नी आणि मुले किंवा त्यांची होणारी पत्नी यांच्यासोबत प्रवास करु शकतात का? यासंदर्भात विचारणा केली होती. यावर बोर्डाने स्पष्ट केले की, कुटुंबीय खेळाडूंसोबत राहणार नाहीत. मात्र, हवे असल्यास वेगळ्या व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल.

संघातील काही खेळाडूंचे पर्सनल शेफ

 भारतीय संघ साखळी फेरीतील चार सामन्यांपैकी ३ सामने भारतात तर पाकिस्तानविरुद्धचा एक सामना श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानात खेळणार आहे. टी वर्ल्ड कप स्पर्धेआधीही अनेक द्विपक्षीय मालिकाही आयोजित करण्यात आल्या होत्या. पण त्यातही खेळाडूंना कुटुंबासोबत राहण्याची परवानगी नव्हती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालीली टीम संपूर्ण टूर्नामेंटमध्ये प्रायव्हेट चार्टर प्लेनने प्रवास करणार आहे. काही खेळाडूंचे पर्सनल शेफही सोबत प्रवास करत आहेत, पण ते जवळच्या हॉटेलमध्येच राहतात.

Web Title : BCCI ने T20 विश्व कप में परिवार की अनुमति अस्वीकृत की, विकल्प दिए।

Web Summary : BCCI ने भारतीय खिलाड़ियों के T20 विश्व कप 2026 के दौरान परिवारों को साथ रखने के अनुरोध को मौजूदा नियमों का हवाला देते हुए अस्वीकार कर दिया। पूर्ण प्रतिबंध नहीं है, लेकिन नियमों के अनुसार दौरे के दौरान परिवार के रहने की सीमा है। BCCI ने वैकल्पिक आवास व्यवस्था की पेशकश की। कुछ खिलाड़ियों के निजी रसोइए होंगे, लेकिन अलग-अलग होटलों में।

Web Title : BCCI Rejects Family Requests for T20 World Cup, Offers Alternatives.

Web Summary : BCCI denied Indian players' request to have families accompany them during the T20 World Cup 2026 in India, citing existing regulations. While a complete ban isn't in place, rules limit family stays during tours. BCCI offered alternative accommodation arrangements. Some players will have personal chefs, but in separate hotels.