IND vs NED : सुपर ८ आधी टीम इंडियात 'सुंदर' फिटनेस चाचणी! उप कर्णधाराला बसवलं बाकावर

सुपर ८ मधील महत्त्वपूर्ण लढतीआधी स्टार ऑलराउंडरचं कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 19:22 IST2026-02-18T19:20:20+5:302026-02-18T19:22:14+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2026 Arshdeep Singh and Washington Sundar Comes In For Kuldeep Yadav And Axar Patel India Playing XI vs Netherlands | IND vs NED : सुपर ८ आधी टीम इंडियात 'सुंदर' फिटनेस चाचणी! उप कर्णधाराला बसवलं बाकावर

IND vs NED : सुपर ८ आधी टीम इंडियात 'सुंदर' फिटनेस चाचणी! उप कर्णधाराला बसवलं बाकावर

India vs Netherlands, 36th Match Washington Sundar Comes In India Playing XI : आयसीसी टी वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात भारतीय संघ दोन बदलासह मैदानात उतरला आहे.  गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या नेदरलँडसविरुद्धच्या सामन्यातून वॉशिंग्टन सुंदरला कमबॅकची संधी देण्यात आली. उप कर्णधार अक्षर पटलेला बाकावर बसवून सुपर ८ आधी त्याला आजवण्याचा डाव सूर्यकुमार यादवनं खेळला आहे. याशिवाय कुलदीप यादवच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली आहे. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
 

वॉशिंग्टन सुंदरच्या फिटनेसची चाचपणी!

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता. परिणामी न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला तो मुकला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले होते. पण भारतीय संघाने घाई गडबड न करता त्याच्या बदली खेळाडू न घेता त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला. अखेर सुपर ८ च्या महत्त्वपूर्ण लढती आधी नेदरलंड्स विरुद्ध त्याला संधी देण्यात आली आहे. फिटनेस सिद्ध करून तो दमदार कमबॅक करणार का? ते पाहण्याजोगे असेल. 
 

भारतीय संघाची  प्लेइंग इलेव्हन 

 ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

नेदरलँड्सची प्लेइंग इलेव्हन 

मायकेल लेविट, मॅक्स ओ'डॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), झॅक लायन-कॅशेट, नोहा क्रोस, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, काइल क्लेन.

Web Title : भारत बनाम नीदरलैंड: सुंदर अंदर, अक्षर बाहर, सुपर 8 से पहले!

Web Summary : टीम इंडिया ने नीदरलैंड के खिलाफ दो बदलाव किए: वाशिंगटन सुंदर ने अक्षर पटेल की जगह ली, और अर्शदीप सिंह कुलदीप यादव की जगह खेलेंगे। यह रणनीतिक कदम सुपर 8 चरण से पहले फिटनेस का परीक्षण करना है, सूर्यकुमार यादव टीम का नेतृत्व कर रहे हैं।

Web Title : India vs Netherlands: Sundar in, Axar out before Super 8!

Web Summary : Team India faces Netherlands with two changes: Washington Sundar replaces Axar Patel, and Arshdeep Singh replaces Kuldeep Yadav. This strategic move aims to test fitness before the Super 8 stage, with Suryakumar Yadav leading the team.