ICC T20 World Cup 2021 Afghanistan vs Pakistan Scoreacard Live updates : अफगाणिस्तान आणि सेमी फायनल यांच्या मार्गात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) उभा राहिला. अफगाणिस्ताननं ठेवलेल्या १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पण, बाबर व फाखर जमान यांनी डाव सावरला. राशिद खाननं उत्तम गोलंदाजी करून सामना अटीतटीचा बनवला, परंतु पुन्हा एकदा आसिफ अली ( Asif Ali) पाकिस्तानसाठी धावला. त्यानं एकाच षटकात ४ षटकार खेचून पाकिस्तानला सलग तिसरा विजय मिळवून दिला.
अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्लाह झझाई ( ०) व मोहम्मद शाबजाज ( ८) यांना अुक्रमने इमाद वासीम व शाहिन यांनी बाद केले. त्यानंतर टप्प्याटप्पानं अफगाणिस्तानच्या विकेट्स पडतच होत्या. पण, त्यांचा प्रत्येक फलंदाज आक्रमक पवित्र्यातच होता. रहमनुल्लाह गुर्बाज ( १०) व अस्घर अफघान ( १०) हेही आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसले. करीन जनत ( १५) हा बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानची अवस्था ६ बाद ७६ अशी झाली होती. नजिबुल्लाह झाद्रान व कर्णधार मोहम्मद नबी यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु २२ धावांवर झाद्रान बाद झाला. नबी व गुलबदीन नैब या जोडीनं अफगाणिस्तानला सन्मानजक धावसंख्या उभी करून दिली. नबी ३५ आणि नैब ३५ धावांवर नाबाद राहिले. या जोडीनं अखेरच्या पाच षटकांत धावांचा पाऊस पाडला आणि संघाला ६ बाद १४७ धावा उभ्या करून दिल्या.
![]()
पाकिस्तानची सुरूवात साजेशी झाली नाही. मोहम्मद रिझवाद ८ धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आजम आणि फाखर जमान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. मुजीब उर रहमाननं अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. १२ धावांवर पहिली विकेट पडूनही बाबर ( Babar Azam) खेळपट्टीवर अडून बसला. बाबर व जमान यांनी पाकिस्तानला ११ षटकांत १ बाद ७५ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. राशीद खानच्या गोलंदाजीवर DRSमुळे जीवदान मिळालेल्या बाबरनं अर्धशतकी खेळी केली. पण, फाखर २५ चेंडूंत ३० धावांवर बाद झाला. मोहम्मद हाफिज ( १०) पुन्हा अपयशी ठरला.
![]()
१७व्या षटकात राशिदच्या गोलंदाजीवर बाबरला जीवदान मिळालं, नवीननं त्याचा झेल सोडला. पण, त्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राशिदनं त्रिफळा उडवत ५१ धावा करणाऱ्या बाबरला माघारी पाठवलं. पुढच्याच षटकात नवीन-उल-हकनं सोडलेल्या झेलची वसूली केली आणि शोएब मलिकची ( १९) महत्त्वाची विकेट घेतली. पाकिस्तानला १२ चेंडूंत २४ धावांची गरज होती आणि आसिफ फलीनं १९व्या षटकात करीम जनतला चार खणखणीत षटकार खेचून सर्व दडपण झुगारून लावलं आणि पाकिस्तानला ५ विकेट्स व ६ चेंडू राखून जिंकवलं. आसिफनं ७ चेंडूंत २५ धावा केल्या.
Web Title: ICC T20 World Cup 2021 PAK vs AFG Live updates : Pakistan need 24 runs from 12 balls and then Asif Ali smashed 6,0,6,0,6,6, Pakistan won by 5 wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.