T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: तालिबान्यांचा अधिकारी भारत-अफगाणिस्तान सामना पाहण्यासाठी थेट स्टेडियममध्ये पोहोचला, Video पोस्ट करून मॅसेज दिला

ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : भारताच्या २ बाद २१० धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या ३ बाद ५८ धावा झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:13 PM2021-11-03T22:13:15+5:302021-11-03T22:14:29+5:30

whatsapp join usJoin us
ICC T20 World Cup 2021 Ind vs Afg Live updates : Taliban official attends BCCI hosted T20 World Cup, releases video message | T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: तालिबान्यांचा अधिकारी भारत-अफगाणिस्तान सामना पाहण्यासाठी थेट स्टेडियममध्ये पोहोचला, Video पोस्ट करून मॅसेज दिला

T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: तालिबान्यांचा अधिकारी भारत-अफगाणिस्तान सामना पाहण्यासाठी थेट स्टेडियममध्ये पोहोचला, Video पोस्ट करून मॅसेज दिला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan Scoreacard Live updates : रोहित शर्मा व लोकेश राहुल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध २ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये २००+ धावा करणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. रोहितनं ७४ आणि लोकेशच्या ६९ धावांच्या खेळीनंतर हार्दिक पांड्या व रिषभ पंत यांनीही वाहत्या गंगेत हात धुतले. रिषभ पंतनं १३ चेंडूंत २७ ( १ चौकार व ३ षटकार) धावा केल्या, तर हार्दिक पांड्यानं १३ चेंडूंत ३५ ( ४ चौकार व २ षटकार) धावा करताना टीम इंडियाला २ बाद २१० धावांचा पल्ला गाठून दिला. हा सामना पाहण्यासाठी तालिबानी अधिकारी थेट  स्टेडियममध्ये आला होता. त्यानं सोशल मीडियावर थेट स्टेडियमवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. 

या व्हिडीओत त्यानं अफगाणिस्तान संघाला शुभेच्छा देताना विजय आपलाच असेल, असा दावा केला.  



यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या
२१०/२ भारत वि. अफगाणिस्तान, अबु धाबी
१९०/४ अफगाणिस्तान वि. स्कॉटलंड, शाहजा
१८९/२ पाकिस्तान वि. नामिबिया, अबु धाबी
१८१/७ बांगलादेश वि. पापुआ न्यू गिनी, अमेरट 
 

Web Title: ICC T20 World Cup 2021 Ind vs Afg Live updates : Taliban official attends BCCI hosted T20 World Cup, releases video message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.