Join us  

T20 World Cup 2021 Ind vs Afg Live Score: नाणेफेकीचा कौल पुन्हा विरोधात गेला, टीम इंडियानं प्लेइंग इलेव्हनमध्ये पुन्हा प्रयोग केला

ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan  Scoreacard Live updates : भारतीय संघाच्या कामगिरीकडे आज साऱ्यांचे लक्ष लागले आहे, त्यामागं कारणही तसं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 7:08 PM

Open in App

ICC T20 World Cup 2021 India vs Afghanistan  Scoreacard Live updates : भारतीय संघाच्या कामगिरीकडे आज साऱ्यांचे लक्ष लागले आहे, त्यामागं कारणही तसं आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याच्या भारताच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या असल्या तरी चाहत्यांना अजूनही भाबडी आस आहे. अफगाणिस्तानविरुद्धचा हा सामना एकतर्फी होईल, असे स्वप्न रंगवणाऱ्या भारतीय चाहत्यांना प्रतिस्पर्धीच्या ताकदीचा अंदाज नाही. अफगाणिस्तानकडे जगातील सर्वोत्तम फिरकीपटू आहेत आणि त्यांनी पाकिस्तानलाही विजयासाठी रडवले होते. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. 

रोहित शर्माच्या फलंदाजीच्या क्रमवारीपासून ते प्लेइंग इलेव्हनमधील बदलापर्यंत साऱ्यांकडेच सर्वांचे लक्ष होते. न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशन खेळला अन् त्याला थेट ओपनिंगला पाठवले गेले. वन डाऊन आलेल्या रोहितच्या क्रमवारीवरून प्रचंड टीका झाली. त्यामुळे आज रोहित पुन्हा ओपनिंगला दिसण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार तंदुरुस्त झाला आहे आणि सराव सत्रातही सहभाग घेतला. हार्दिक पांड्याला आणखी किती संधी मिळेल, हाही प्रश्न सतावत होताच. पण, त्याला पुन्हा संधी दिली. सूर्यकुमार यादव संघात परतला आणि आर अश्विननं  वरुण चक्रवर्थीच्या जागी स्थान पटकावलं.

विराट कोहलीनं सलग सहाव्या सामन्यात नाणेफेक गमावली आहे. आर अश्विन चार वर्षांनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन  करत आहे.  

भारतीय संघ - लोकेश राहुल. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतअफगाणिस्तानआर अश्विनसूर्यकुमार अशोक यादव
Open in App