Join us
Daily Top 2Weekly Top 5

ICC Rankings : जसप्रीत बुमराह एकही मॅच न खेळता फायद्यात! अभिषेक शर्माचाही दबदबा कायम

न्यूझीलंड कर्णधार सँटनरचीही कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:25 IST

Open in App

भारतीय संघाने ८ मार्चला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यानंतर एकही सामना खेळलेला नाही. IPL नंतर जुलैमध्ये भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळताना दिसणार आहे. पण मॅच न खेळताही ICC क्रमवारीत जसप्रीत बुमराहला फायदा झाला असून त्याची टी-२० क्रमवारीत आघाडीच्या ५ गोलंदांमध्ये वर्णी लागली आहे

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

एकही मॅच न खेळता बुमराह फायद्यात! ते कसं?

जसप्रीत बुमराहने सलग दुसऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. गत हंगामात १५ विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाने यंदाच्या हंगामात १४ विकेट्स घेतल्या. फायनलमध्येही त्याने मोलाची भूमिका बजावली. पण टी-२० क्रमवारीत तो अव्वल पाचमध्येही नव्हती. पण दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेत कॉर्बिन बॉशची कामगिरी फिकी ठरली अन् त्याचा जसप्रीत बुमराहला फायदा झाला. एका स्थानाच्या सुधारणेसह तो ७०२ रेटिंग सह पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. 

पाकिस्तानी खेळाडूवर पैसे उधळणाऱ्या काव्या मारनसाठी ललित मोदीचा मेसेज! म्हणे, "...तर मला कॉल करा"

बांगलादेशच्या कर्णधाराची हवा

बांगदेशचा कर्णधार मेहदी हसन मिराज याने पाकिस्तानविरुद्धच्या घरच्या मैदानातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत खास छाप सोडली. बांगलादेशच्या संघाला मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना त्याने ३ सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जारोवर तो टी-२० मधील गोलंदाजांच्या क्रमवारीत ९ स्थानांनी सुधारणेसह आता सातव्या क्रमांकावर पोहचला आहे. तंजीद हसन याला तर क्रमवारीत ३१ स्थानांनी सुधारणा झाली आहे. 

न्यूझीलंड कर्णधार सँटनरचीही कमाल

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर हा सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यात त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवून दिली. याचा त्याला फायदा झाला असून तो ११ स्थानांच्या सुधारणेसह १३ व्या क्रमांकावर पोहचला आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत तो कारकिर्दीतील सर्वोच्च ७ व्या क्रमांकावर विराजमान आहे. 

अभिषेक शर्मा अव्वलस्थानी कायम

भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मासाठी टी-२०- वर्ल्ड कप स्पर्धा काही खास राहिली नाही. पण फायनलमध्ये कडक अर्धशतकासह त्याने यंदाच्या स्पर्धेतील २ अर्धशतकाच्या जोरावर आपले अव्वलस्थान कायम राखले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : ICC Rankings: Bumrah Benefits Without Playing; Abhishek Sharma Still Dominates

Web Summary : Jasprit Bumrah rises in ICC T20I rankings without playing, benefiting from others' performances. Mehidy Hasan Miraz climbs after strong performances against Pakistan. Abhishek Sharma maintains top position despite an average T20 World Cup.
टॅग्स :आयसीसीटी-20 क्रिकेटजसप्रित बुमराहअभिषेक शर्मा