नवी दिल्ली: टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सहयोगी देशांच्या निर्भीड कामगिरीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी कौतुक केले. त्यांच्या प्रगतीला त्यांनी क्रिकेट एक परिपक्व जागतिक खेळ बनत असल्याचे संकेत मानले.
त्याच वेळी गुप्ता यांनी सांगितले की, ‘भारत हा क्रिकेटचा मुख्य बाजार असला तरी, हा खेळ निश्चितपणे जागतिक स्तरावर विस्तारत आहे.’ भारतात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इटली, अमेरिका, नेपाळ आणि झिम्बाब्वे यांसारख्या संघांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.
गुप्ता यांनी एका स्तंभलेखात म्हटले की, ‘भारत, जागतिक क्रिकेटचा मुख्य बाजार आहे. येथील प्रचंड चाहतावर्ग, आर्थिक ताकद आणि खेळावरील सातत्यपूर्ण प्रेम, यामुळे एक असे व्यासपीठ तयार होते, ज्याचा संपूर्ण परिसंस्थेला फायदा होतो. मात्र, आयसीसी स्पर्धांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की, हा खेळ एका ठरावीक मर्यादेपलीकडे खूप पुढे गेला आहे.’