Join us

ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर ही जोडी फक्त वनडे खेळताना दिसेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 23:01 IST

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या ICC च्या एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज भारतीय खेळाडूंची नावे गायब झाली होती. मागच्या आठवड्यात टॉप ५ मध्ये दिसलेली अन् क्रिकेटच्या या एकमेव प्रकारात सक्रीय असताना ही जोडीचं नाव नव्याएकदिवसीय  क्रमवारीत कसं नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आयसीसीच्या नियमानुसार, बराच काळ वनडे क्रिकेटपासून दूर असल्यामुळे हे झालं असावं, तर्कही लावण्यात आला.  पण यामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नियम नव्हे तांत्रिक चुकीमुळे गडबड घोटाळा; रिव्ह्यू घेतला अन्...

ICC च्या नियमामुळं नाही तर तांत्रिक चुकीमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची नावे आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमावारीतून गायब झाली होती, असं  आयसीसीनं मान्य केले आहे. एवढेच नाही ही चूक दुरुस्त करत रोहित शर्मा एकदिवसीय क्रमवारीत दुसऱ्या तर विराट कोहलीचं नाव चौथ्या क्रमांकावर झळकलं आहे. आयसीसीच्या मते, सिस्टम त्रुटीमुळे दोन्ही खेळाडूंची नावे तात्पुरत्या स्वरूपात  यादीतून वगळण्यात आली होती. यात सुधारणा करत पूर्वी प्रमाणेच ते आपल्या स्थानावर कायम आहेत.  

Asia Cup 2025 : दुबईचं तिकीट मिळालं; पण या स्टार खेळाडूवर तिथं जाऊन बाकावर बसण्याचीच येणार वेळ!

गिलसह रोहित-विराट टॉप ५ मध्ये

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत शुबमन गिल ७८४ रेटिंग पॉइंट्स सह अव्वलस्थानी आहे. त्यापाठोपाठ रोहित शर्माचा  नंबर लागतो. हिटमॅनच्या खात्यात ७५६ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. बाबर आझम ७५१ रेटिंग पॉइंट्ससह तिसऱ्या तर विराट कोहली ७३६ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे.

आता फक्त वनडेवर फोकस

२०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित-विराट दोघांनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याआधी अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेआधी रोहित शर्मा पाठोपाठा विराट कोहलीनं कसोटीत निवृत्तीचा निर्णय घेतला. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही जोडी फक्त एकदिवसीय सामनेच खेळताना दिसेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ते मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. 

टॅग्स :आयसीसीरोहित शर्माविराट कोहलीशुभमन गिलबाबर आजमभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया