Join us

ICC Ranking : शुबमन गिलसह आकाशदीपची 'उंच उंडी'! जो रूटनं गमावला नंबर वनचा ताज

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अव्वलस्थानी कायम, बॅटिंगमध्ये नव्या गड्याचं राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:24 IST

Open in App

ICC Test Rankings Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा स्टार बॅटर जो रूट याने आपले अव्वलस्थान गमावले असून दुसरीकडे भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलनं क्रमवारीत मोठी झेप घेतलीये.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टेस्टमध्ये कुणी केला जो रुटच्या जागी नंबर वनवर कब्जा?

आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीत, जो रुटला त्याच्या संघातील सहकारी हॅरी ब्रूकनं मागे टाकले आहे. टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत हॅरी ब्रूकनं आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून दिलीये. याचा त्याला क्रमवारीत मोठा फायदा झाला असून ८८६ रेटिंग पॉइंट्ससह तो आता कसोटीतील नंबर वन बॅटर ठरलाय. जो रुट ८६८ रेटिंगसह क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.

टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!

शुबमन गिलची मोठी झेप

कसोटी क्रमवारीत फलंदाजीमध्ये न्यूझीलंडचा बॅटर केन विल्यमसन ८६७ रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर कायम असून त्यापाठोपाठ यशस्वी जैस्वाल ८५८ रेटिंग पॉइंट्स मिळवत चौथ्या स्थानावर असून स्टीव्ह स्मिथ ८१३ पॉइंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल इंग्लंडच्या दौऱ्यात सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसतोय. दोन शतकांसह एका द्विशतकाच्या जोरावर भारतीय कर्णधार १५ स्थानांनी मोठी झेप घेत सहाव्या क्रमांकावर पोहचलाय. त्याच्या खात्यात सध्या ८०७ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत.

गोलंदाजीत आकाश दीपची कमाल

बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी खेळताना आकाश दीपनं आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवून दिली. दुसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्स घेत त्याने भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला होता. क्रमवारीतही त्याला या कामगिरीचा फायदा झाला आहे. कसोटीतील गोलंदाजांच्या क्रमवारीत ३९ स्थानासह उंच उडी घेत तो आता ४५ व्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याच्या खात्यात ४५२ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. मोहम्मद सिराज यानेही बर्मिंगहॅम कसोटीतील ७ विकेट्सच्या जोरावर क्रमवारीत ६ स्थानांनी सुधारणा करत २२ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याच्या खात्यात ६१९ रेटिंग पॉइंट्स जमा आहेत. ८९८ रेटिंग पॉइंट्स सह जसप्रीत बुमराह कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी कायम आहे. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५आयसीसीभारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलआकाश दीपजसप्रित बुमराहमोहम्मद सिराजजो रूट