ICC Playing Conditions T20I Powerplay Rule Change For Shortened Matches : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) टी २० क्रिकेटमधील 'पॉवर प्ले'संदर्भात नवा नियम लागू केला आहे. पाऊस किंवा अन्य कारणास्तव सामन्यात व्यत्यय आल्यानंतर षटके कपातीच्या निर्णयानंतर हा नियम सक्रीय होईल. थोडक्यात टी-२० सामन्यात व्यत्यय आल्यावर षटकांची संख्या कमी करण्यात आल्यावर या नव्या नियमानुसार पॉवर प्लेमध्ये किती षटके टाकायची ते ठरवले जाईल. सध्याच्या घडीला २० षटकांच्या खेळात ६ षटकांचा 'पॉवर प्ले' असतो. इथं जाणून घेऊयात नव्या नियमासंदर्भात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० क्रिकेटमध्ये 'पॉवर प्ले' चा नवा नियम
जुलै २०२५ पासून लागू होणाऱ्या 'पॉवर प्ले'संदर्भातील नव्या नियमानुसार, जर निर्धारित २० षटकांचा सामना काही कारणास्तवर ८ षटकांचा खेळवण्यात आला तर या सामन्यासाठी २.२ षटकांचा पॉवर प्ले असेल. याचा अर्थ १४ चेंडू पर्यंत ३० यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त २ क्षेत्ररक्षक असतील. ९ षटकांचा सामना असेल तर पॉवर प्ले २.४ आणि ५ षटकांच्या सामन्यात १.३ षटकांचा खेळ हा पॉवर प्लेच्या रुपात गणला जाईल. टी-२० सामन्याचा निकाल लावण्यासाठी किमान ५ षटकांचा खेळ होणं अपेक्षित असते.
ENG vs IND : पहिल्या T20I सामन्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन?
कमी झालेल्या षटकानुसार, कसा ठरवले जाईल 'पॉवर प्ले'च गणित
- ५ षटकांच्या खेळात -१.३ षटकांचा 'पॉवर प्ले'
- ६ षटकांच्या खेळात -१.५ षटकांचा 'पॉवर प्ले'
- ७ षटकांच्या खेळात -२.१ षटकांचा 'पॉवर प्ले'
- ८ षटकांच्या खेळात -२.२ षटकांचा 'पॉवर प्ले'
- ९ षटकांच्या खेळात -२.४ षटकांचा 'पॉवर प्ले'
- १० षटकांच्या खेळात - ३ षटकांचा 'पॉवर प्ले'
- ११ षटकांच्या खेळात -३.२ षटकांचा 'पॉवर प्ले'
- १२ षटकांच्या खेळात -३.४ षटकांचा 'पॉवर प्ले'
- १३ षटकांच्या खेळात -३.५ षटकांचा 'पॉवर प्ले'
- १४ षटकांच्या खेळात -४.१ षटकांचा 'पॉवर प्ले'
- १५ षटकांच्या खेळात -४.३ षटकांचा 'पॉवर प्ले'
- १६ षटकांच्या खेळात -४.५ षटकांचा 'पॉवर प्ले'
- १७ षटकांच्या खेळात -५.१ षटकांचा 'पॉवर प्ले'
- १८ षटकांच्या खेळात -५.२ षटकांचा 'पॉवर प्ले'
- १९ षटकांच्या खेळात -५.४ षटकांचा 'पॉवर प्ले'