Shubman Gill Race With Steve Smith ICC Player Of The Month : टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिल सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेनंतर दुबईच्या मैदानातही त्याने हवा केलीये. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचवण्यात त्याचाही मोलाचा वाटा आहे. ९ मार्चला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यातही त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या बहुप्रतिक्षित लढती आधी भारतीय सलामीवीराला आयसीसीने गूडन्यूज दिलीये. आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) फेब्रुवारी महिन्यातील पुरस्कारासाठी शुबमन गिलला नामांकित केले आहे. त्याच्यासह या पुरस्काराच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्सही आहे. भारत-न्य़ूझीलंड यांच्यात दुबईत रंगणाऱ्या फायनल लढतीनंतर पुढच्या आठवड्यात या पुरस्कार विजेत्याची घोषणा करण्यात येईल.
गिलच्या खात्यात पाच वनडेत २ शतकं
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी शुबमन गिलला नामांकित केले आहे. फेब्रुवारी महिन्यातील दमदार कामगिरीमुळे त्याचा या यादीत समावेश झाला आहे. शुबमन गिलनं ५ वनडेत ९४.९१ च्या स्ट्राइक रेटसह १०१.५० च्या सरासरीने ४०६ धावा केल्या आहेत. इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत गिलनं अनुक्रमे, ८७ , ६० आणि ११२ धावांची खेळी केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या लढतीत त्याने १०१ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले.
स्टीव स्मिथ आणि ग्लेन फिलिप्सची कामगिरी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर स्टीव्ह स्मिथनं वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या स्पर्धेत त्याला बॅटिंगमध्ये धमक दाखवता आली नाही. पण श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या भात्यातून २ शतके आल्याचे पाहायला मिळाले होते. न्यूझीलंडच्या ताफ्यातील ग्लेन फिलिप्सनं फेब्रुवारीमध्ये ५ वनडेत२३६ धधावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रंगलेल्या तिरंगी वनडे मालिकेत त्याने शतकी खेळी केली होती.