ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

नेमकं काय घडलं? ICC नं त्याला काय शिक्षा दिली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:53 IST2025-08-20T18:41:25+5:302025-08-20T18:53:56+5:30

whatsapp join usJoin us
ICC Penalises Adam Zampa For Breaching Code Of Conduct After Using An ‘Audible Obscenity’ During The 1st ODI Against South Africa | ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Penalises Adam Zampa For Breaching Code Of Conduct : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना  केर्न्सच्या मैदानात खेळवण्यात आला. मंगळवारी झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला ९८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन संघातील स्टार खेळाडूला ICC नं धक्का दिला आहे. मैदानातील गैरवर्तनाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं संबंधित क्रिकेटरवर कारवाई केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर नको ते बोलला;  सगळं स्टंप माईकमध्ये झाले रेकॉर्डिंग

ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ॲडम झाम्पा मॅच वेळी रागाच्या भरात नको ते बोलला अन् फसला. त्याने मैदानात वापरलेले अपशब्द  स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाले. या पुराव्याच्या आधारावर मैदानातील गैरवर्तनाबद्दल आयसीसीने ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला दोषी ठरवले असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

 Matthew Breetzke : आफ्रिकेच्या पठ्ठ्याची कमाल! २९० धावांसह वनडेत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

नेमकं काय घडलं? ICC नं त्याला काय शिक्षा दिली?

आयसीसीच्या निवेदनानुसार, ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ॲडम झाम्पा याने आयसीसी आचार संहितेतील कलम २.३ चे उल्लंघन केले आहे.  मॅच वेळी मैदानात अपशब्द वापरल्या प्रकरणी आयसीसीकडून त्याच्या खात्यात एक डेमेरिट पॉइंट जमा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ३७ व्या षटकात झम्पा गोलंदीज करत होता. खराब क्षेत्ररक्षण आणि ओव्हर थ्रोच्या रुपात अतिरिक्त धावा गेल्यावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने राग व्यक्त करताना अपशब्दाचा वापर केला. त्याचे ते नको ते शब्द स्टंप माईकमध्ये रेकॉर्डिंग झाले अन् त्याच आधारावर क्रिकेटरला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले.

पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियावर ओढावली नामुष्की

पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात २९६ धावा केल्या होत्या. या  धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघ ४०.५ षटकात १९८ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज याने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या बाजूला ॲडम झाम्पा मात्र आपल्या गोलंदाजीतील मॅजिक दाखवायला कमी पडला. १० षटकांच्या कोट्यात त्याने ५८ धावा खर्च करून फक्त एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाच्या तुलनेत पार्ट टाइम बॉलर ट्रॅविस हेड ४ विकेट्स घेत भारी ठरल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: ICC Penalises Adam Zampa For Breaching Code Of Conduct After Using An ‘Audible Obscenity’ During The 1st ODI Against South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.