ICC ODI World Cup Semi Final Scenario : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सातव्या विजयाची नोंद करून उपांत्य फेरीचे स्थान पक्के केले. ३५७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत ५५ धावांत तंबूत पाठवला आणि ३०२ धावांनी सामना जिंकला. भारतीय संघ १४ गुणांची कमाई करून २.१०२ नेट रन रेटसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. आता वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या साखळी फेरीतील १२ सामने शिल्लक आहेत आणि उपांत्य फेरीच्या उर्वरित ३ जागांसाठी ८ संघ अजूनही स्पर्धेत आहेत.
८ मोठे विक्रम! मोहम्मद शमीची रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी; रोहित शर्माची ठरला जगात भारी!
बांगलादेशचा संघ ६ पराभवामुळे स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. श्रीलंका व इंग्लंड ५ पराभवानंतरही शर्यतीत आहेत. इंग्लंडचे ३ सामने शिल्लक आहेत आणि त्यांना ऑस्ट्रेलिया ( ४ नोव्हेंबर), नेदरलँड्स ( ८ नोव्हेंबर) आणि पाकिस्तान ( ११ नोव्हेंबर) यांच्याशी भिडायचे आहे. श्रीलंकेला उर्वरित दोन सामन्यांत बांगलादेश ( ६ नोव्हेंबर) व न्यूझीलंड ( ९ नोव्हेंबर) यांचा सामना करायचा आहे. इंग्लंड व श्रीलंका हे सामने जिंकून ८ गुणांसह शर्यतीत राहू शकतात. पाकिस्तान ( ६ गुण), अफगाणिस्तान ( ६ गुण) व नेदरलँड्स ( ४ गुण) हेही अजून शर्यतीत आहेत. पण, यांना स्वतःच्या कामगिरीसोबतच इतरांवर अवलंबून रहावे लागणार आहे.

पाकिस्तानला उर्वरित सामन्यात न्यूझीलंड ( ४ नोव्हेंबर) आणि इंग्लंड ( ११ नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. त्यात ४ नोव्हेंबरचा सामना पाकिस्तान व न्यूझीलंड यांचे भविष्य ठरवणारा आहे. अफगाणिस्तानला नेदरलँड्स ( ३ नोव्हेंबर), ऑस्ट्रेलिया ( ७ नोव्हेंबर) व दक्षिण आफ्रिका ( १० नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध चमत्कार करावा लागेल. नेदरलँड्सला अफगाणिस्तान, इंग्लंड ( ८ नोव्हेंबर) व भारत ( ११ नोव्हेंबर ) यांच्याविरुद्ध विक्रमी विजय मिळवावा लागेल. 
cr
दक्षिण आफ्रिका ( १२ गुण), ऑस्ट्रेलिया ( ८ गुण) व न्यूझीलंड ( ८ गुण) हे संघ सध्या आघाडीवर आहेत. यापैकी आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांना १४ गुणांसह उपांत्य फेरीचे स्थान निश्चित करता येऊ शकते. ऑस्ट्रेलियाच्या तीन लढती इंग्लंड ( ४ नोव्हेंबर), अफगाणिस्तान ( ७ नोव्हेंबर) व बांगलादेश ( ११ नोव्हेंबर) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. आफ्रिकेला भारत ( ५ नोव्हेंबर) व अफगाणिस्तान ( १० नोव्हेंबर) यांच्याशी खेळायचे आहे. यापैकी एक पराभव आफ्रिका पचवू शकतो, परंतु त्यांना एक विजय नक्की मिळवावा लागेल. न्यूझीलंडचेही दोन सामने आहेत आणि त्यांना दोन्ही जिंकावे लागतील.