Join us

अफगाणिस्तानच्या कामगिरीमुळे पाकिस्तान, न्यूझीलंड 'गॅस'वर; उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात

ICC ODI World Cup Semi Final Scenario : अफगाणिस्तानने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाचव्या विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 20:53 IST

Open in App

ICC ODI World Cup Semi Final Scenario : अफगाणिस्तानने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पाचव्या विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. अफगाणिस्तानच्या २९१ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने २७ षटकांत ७ फलंदाज १४० धावांवर माघारी पाठवले आहेत. अफगाणिस्तानने हाही सामना जिंकल्यास ते १० गुणांसह टॉप फोअरमध्ये म्हणजेच उपांत्य फेरीच्या दिशेने वर सरकतील. अफगाणिस्तान जिंकल्यास सर्वात मोठा धक्का हा पाकिस्तानन्यूझीलंडला बसेल.

पाकिस्तानन्यूझीलंड यांच्या खात्यात प्रत्येकी ८ गुण आहेत, परंतु किवींचा नेट रन रेट चांगला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचा अखेरचा साखळी सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने त्यांचे टेंशन वाढले आहे. पाकिस्तानला अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडचा सामना करायचा आहे.  

अफगाणिस्तान जिंकल्यास काय?- अफगाणिस्तानने हा सामना मोठ्या धावांच्या फरकाने जिंकू नये अशी पाकिस्तान प्रार्थना करत असेल. तसे झाल्यास नेट रन रेटच्या जोरावर ते वर्चस्व राखतील. शिवाय आफ्रिकेविरुद्ध त्यांचा म्हणजेच अफगाणिस्तानचा वाईट पद्धतीने पराभव पाकिस्तानच्या फायद्याचा ठरेल. त्याचवेळी त्यांना इंग्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल आणि न्यूझीलंडचा श्रीलंकेकडून पराभव व पावसामुळे सामना रद्द व्हावा ही त्यांच्यासाठी गरज आहे.  

- न्यूझीलंडलाही अफगाणिस्तानचा विजय महागात पडणार आहे.  न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे.     

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानन्यूझीलंडपाकिस्तानआॅस्ट्रेलिया