ICC ODI World Cup PAK vs AUS Live : भारताविरुद्धच्या पराभवानंतर आज नव्या सुरुवातीच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानमध्ये काहीच सुधारणा दिसलेली नाही. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांच्या पथ्यावर पडला. डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी आक्रमक सुरूवात करून दिली. शादाब खानच्या जागी आज उसामा मीरला शेजाऱ्यांच्या संघात स्थान मिळाले आणि त्याने पाचव्या षटकात वॉर्नरचा सोपा झेल टाकला.

ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी हसन अलीला पहिल्या ३ षटकांत बदडून काढले. शाहीन आफ्रिदी एका बाजूने टिच्चून मारा करत होता, परंतु त्यालाा क्षेत्ररक्षकांकडूनही साथ मिळत नव्हती. पहिल्या षटकात पाकिस्तानने DRS गमावला, तर पाचव्या षटकात वॉर्नरने बाहेरच्या चेंडूवर मारलेला फटका हवेत उडाला. पदार्पणवीर उसामा मीर याच्यासाठी सोपा झेल होता. पण, मिड ऑनला उभ्या असलेल्या मीरने तो टाकला अन् पाकिस्तानच्या खेळाडूंनी डोक्यावर हात मारला.
ऑस्ट्रेलियाचा संघ - मिचेल मार्श, डेव्हिडन वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड
पाकिस्तानचा संघ - अब्दुल्लाह शफिक, इमाम-उल-हक, बाबर आजम, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ