केन विलियम्सनचं 'लक' की लोकेश राहुलची अती'घाई'? भारताची डोकेदुखी कुणामुळे वाढली?

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : भारताच्या ३९७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दोन्ही सलामीवीर ३९ धावांवर गमावले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 08:20 PM2023-11-15T20:20:07+5:302023-11-15T20:20:27+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live :  Kane Williamson is riding on his luck, KL will be kicking himself for disturbing the stumps before the ball came, Video | केन विलियम्सनचं 'लक' की लोकेश राहुलची अती'घाई'? भारताची डोकेदुखी कुणामुळे वाढली?

केन विलियम्सनचं 'लक' की लोकेश राहुलची अती'घाई'? भारताची डोकेदुखी कुणामुळे वाढली?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : भारताच्या ३९७ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दोन्ही सलामीवीर ३९ धावांवर गमावले होते. मोहम्मद शमीला लवकर गोलंदाजीसाठी बोलावण्याचा निर्णय योग्य ठरला. किवींना पहिल्या १० षटकांत ४६ धावाच करता आल्या होत्या, परंतु केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल ही जोडी खेळप्टटीवर उभी राहिली. १८व्या षटकात ही जोडी तोडण्याची आयती संधी चालून आलेली, परंतु... 

विराट, रोहितने विश्वविक्रम रचले; सोबत टीम इंडियाच्या नावावरही ८ मोठे पराक्रम लिहिले गेले


रोहित शर्मा  (४७) आणि शुबमन गिल यांनी ७१ धावांची वादळी सुरुवात करून दिल्यानंतर विराट व श्रेयस यांनी १२८ चेंडूंत १६३ धावांची भागीदारी केली. विराटने आज पन्नासावे शतक झळकावून विश्वविक्रम रचला आणि त्याच्या खेळीला ४४व्या षटकात ब्रेक लागला. तो ११३ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार खेचून ११७ धावांवर बाद झाला. श्रेयसने ७० चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह १०५ धावांची वादळी खेळी केली. लोकेश राहुलसह त्याने २९ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. लोकेश २० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर नाबाद राहिला, तर शुबमन ६६ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ३९७ धावा केल्या.


जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांचा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी संयमाने सामना केला. सहाव्या षटकात रोहितने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती सोपवला आणि त्याने पहिले यश मिळवून दिले. शमीने टाकलेला पहिलाच चेंडू डेवॉन कॉनवेच्या ( १३) बॅटची कड घेत यष्टिंमागे गेला अन् लोकेशने डाव्या बाजूला झेप घेत अविश्वसनीय झेल टिपला. ३ षटकानंतर शमीला पुन्हा विश्रांती दिली गेली आणि तेथे केन विलियम्सन व डॅरिल मिचेल यांना सेट होण्याची संधी मिळाली. दोघांची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा शमीला गोलंदाजीला आणले अन् मिचेलने षटकाराने त्याचे स्वागत केले. २० षटकांत भारताच्या १ बाद १४९ धावा होत्या, तर किवींनी २ बाद १२४ धावांपर्यंत मॅच नेली होती.


केन व डॅरिल यांनी ९० चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर एक चोरटी धाव घेण्याचा केनने केलेला प्रयत्न किवींना महागात पडला असता. १८व्या षटकात केनने पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवला अन् एक धाव घेण्यासाठी पळाला. नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या मिचेलने धाव घेण्याची उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे केन माघारी परतला, त्याला बाद करण्याची संधी होती. पण, चेंडू यष्टींवर आदळण्यापूर्वीच लोकेश राहुलच्या ग्लोव्ह्जमुळे बेल्स पडल्या. तो डायरेक्ट हिट लागला असता तर केन बाद झाला असता आणि ही शतकी भागीदारीही पूर्ण झाली नसती.  

Web Title: ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live :  Kane Williamson is riding on his luck, KL will be kicking himself for disturbing the stumps before the ball came, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.