हम पाँच! रोहित शर्माची टीम इंडियाच्या स्पेशल ५ मध्ये एन्ट्री; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

ICC ODI World Cup IND vs ENG Live : ३ बाद ४० अशा दयनीय अवस्थेतून रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीने टीम इंडियाला सावरले आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 03:55 PM2023-10-29T15:55:27+5:302023-10-29T15:55:49+5:30

whatsapp join usJoin us
ICC ODI World Cup IND vs ENG Live : 54th ODI fifty for the Indian captain Rohit Sharma, he becomes the fifth Indian batter to score 18000 runs in international cricket, India 89/3 | हम पाँच! रोहित शर्माची टीम इंडियाच्या स्पेशल ५ मध्ये एन्ट्री; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

हम पाँच! रोहित शर्माची टीम इंडियाच्या स्पेशल ५ मध्ये एन्ट्री; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC ODI World Cup IND vs ENG Live : ३ बाद ४० अशा दयनीय अवस्थेतून रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीने टीम इंडियाला सावरले आहे. इंग्लंडविरुद्धच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात भारताला काही खास सुरुवात करता आली नाही. कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) संयमी खेळ करताना अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून हा त्याचा १०० वा सामना आहे आणि त्यात त्याने मोठा पराक्रम नोंदवला. भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक ३३२ सामने महेंद्रसिंग धोनीने खेळले आहेत. त्यापाठोपाठ मोहम्मद अझरुद्दीन ( २२१), विराट कोहली ( २१३), सौरव गांगुली ( १९५), कपिल देव ( १०८), राहुल द्रविड ( १०४)  व रोहित ( १००) असा क्रमांक येतो.  

विराट कोहलीची सचिनच्या नकोशा विक्रमाशी बरोबरी, इंग्लंडच्या बार्मी आर्मीने मर्यादा ओलांडली


इंग्लंडने प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आतापर्यंत अपयशी ठरलेल्या इंग्लंडचा खेळ भारताविरुद्ध उंचावलेला पाहायला मिळाला. तगडे लक्ष्य उभं करण्याचं दडपण घेऊन भारतीय फलंदाज मैदानावर उतरले आण ख्रिस वोक्सने चौथ्या षटकात अप्रतिम चेंडूवर शुबमन गिलचा ( ९) त्रिफळा उडवला.  इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिम कामगिरी करून विराट कोहलीवरील दडपण वाढवले. त्यामुळे विराटकडून ( ०) चुकीचा फटका खेळला गेला आणि डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर मिड ऑफला बेन स्टोक्सने सहज झेल घेतला.  रोहित शर्मा डिफेन्सीव्ह मोडमध्ये गेला.  श्रेयस अय्यरने पुन्हा निराश केले आणि वोक्सच्या बाऊन्सरवर अय्यर ( ४) पुल मारायला गेला अन् चेंडू मिड ऑनला उभ्या असलेल्या मार्क वूडच्या हाती सहज विसावला.  

Image
रोहितने आज २०२३ मध्ये वन डे क्रिकेटमधील १००० धावांचा टप्पाही ओलांडला. रोहितने एका वर्षात ५ वेळा १०००+ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांनी सर्वाधिक ७ वेळा, सौरव गांगुलने ६ वेळा हा टप्पा ओलांडला. रोहितने ६६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावांचा टप्पाही ओलांडला. त्याने ४७८ इनिंग्जमध्ये हा पल्ला ओलांडला आणि भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० हून अधिक धावा करणारा तो पाचवा फलंदाज ठरला. सचिन तेंडुलकर ( ३४३५७), विराट कोहली ( २६१२१), राहुल द्रविड ( २४०६४), सौरव गांगुली ( १८४३३) व रोहित ( १८०००*) असे हे भारताचे हम पाँच आहेत.  
 

Web Title: ICC ODI World Cup IND vs ENG Live : 54th ODI fifty for the Indian captain Rohit Sharma, he becomes the fifth Indian batter to score 18000 runs in international cricket, India 89/3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.