ICC ODI Rankings Virat Kohli Dethrones Rohit Sharma And BecomeWorld No.1 ODI Batter : क्रिकेट जगतातील रनमशिन विराट कोहली याने आयसीसी वनडे क्रमवारीत हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकत पुन्हा नंबर वनवर कब्जा केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील वडोदराच्या मैदानात त्याने दमदार खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर तो ICC वनडे क्रमवारीत अव्वलस्थानावर विराजमान झाला आहे. दुसरीकडे रोहित शर्माला पहिल्या स्थानावरुन थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ICC क्रमवारीत रोहित-विराट यांच्यात न्यूझीलंडचा स्टार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत ७८५ रेटिंग पॉइंट्ससह विराट कोहली वनडेत जगातील नंबर वन फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माच्या खात्यात ७७५ रेटिंग पॉइंट्स आहेत. रोहित आणि विराट यांच्यात १० रेटिंगचा फरक दिसून येतो. पहिल्या वनडेत न्यूझीलंडच्या संघाकडून डॅरिल मिचेलनं दमदार खेळी केली होती. या जोरावर तो दुसऱ्या स्थानावर पोहचला असून विराटपेक्षा तो फक्त एका रेटिंग पॉइंट्ससह मागे आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर तिघांच्या क्रमवारीत पुन्हा बदल होणार की, विराट कोहली सातत्यपूर्ण कामगिरीसह नंबर वनचा ताज कायम ठेवणार ते पाहण्याजोगे असेल. T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
वनडेत किंग कोहलीचा धमाक्यावर धमाका
माजी भारतीय कर्णधार सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेपासून आतापर्यंत कोहलीने ७४ नाबाद, १३५, १०२, ६५ नाबाद आणि ९३ अशा धावा केल्या असून, याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने वनडेत पुन्हा नंबर वनचा ताज मिळवला आहे. विराट कोहलीचे आयसीसी क्रमवारीत सर्वोच्च रॅकिंग पॉइंट्सचा आकडा हा ९०९ हा आहे. ही कामगिरी त्याने २०१८ मध्ये नोंदवली होती.
Web Summary : Virat Kohli dethrones Rohit Sharma to become the top ODI batter in ICC rankings after his impressive performance against New Zealand. Kohli's consistent form, including a recent 93-run knock, propelled him to the top, while Rohit Sharma slipped to third position. New Zealand's Daryl Mitchell is now second.
Web Summary : विराट कोहली ने आईसीसी वनडे रैंकिंग में रोहित शर्मा को पछाड़कर पहला स्थान हासिल किया। न्यूजीलैंड के खिलाफ कोहली के शानदार प्रदर्शन ने उन्हें शीर्ष पर पहुंचाया, जबकि रोहित शर्मा तीसरे स्थान पर खिसक गए। न्यूजीलैंड के डेरिल मिशेल अब दूसरे स्थान पर हैं।