Join us

वनडेत स्मृतीचा दबदबा! विक्रमी सेंच्युरीसह एलिसा हीलीची 'मुसंडी'! या पाक छोरीची टॉप १० मध्ये एन्ट्री

ICC Women's ODI Rankings Top 10 Players :स्मृती मानधना अव्वलस्थानी कायम; ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीलीची उंच उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:02 IST

Open in App

ICC Women's ODI Rankings Top 10 Players : टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यात विक्रमी शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिला संघाची कर्णधार एलिसा हीली हिने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील १३ व्या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठला करताना एलिसा हीली हिने २०७ चेंडूत २१ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १४२ धावांची मॅच विनिंग खेळी केली होती. दमदार खेळीच्या जोरावर तिने आयसीसीच्या महिला वनडे क्रमवारीत ७०० रेटिंग पॉइंट्स खात्यात जमा करत ९ स्थानांनी सुधारणा करत चौथ्या स्थानावर विराजमान झाली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

स्मृतीसह ऑस्ट्रेलियाची बेथ मून अन् इंग्लंडची ब्रंट टॉप ३ मध्ये

 ICC च्या नव्या क्रमवारीत भारताची सलामीची बॅटर स्मृती मानधना हिने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. स्मृीत ७९३ रेटिंग पॉइंट्ससह अव्वलस्थानावर आहे. तिच्या पाठोपाठ इंग्लंडची नॅट सायव्हर ब्रंट (७४६ रेटिंग पॉइंट्स)  आणि बेथ मूनी (७१८ रेटिंग पॉइंट्स) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीलीसह दक्षिण आफ्रिकेची ल  साउथ अफ्रीका कीलॉरा वॉल्व्हार्ड संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर असून न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन २ स्थानांच्या सुधारणेसह सहाव्या स्थानावर आहे.

VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...

तझमिन ब्रिट्सला फटका

भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात मॅच विनिंग सिक्सर मारणारी एलिसा पेरी एका स्थानाच्या घसरणीसीह सातव्या तर ॲशली गार्डनर ३ स्थानाच्या घसरणीसह आठव्या स्थानावर गेली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तझमिन ब्रिट्सला मोठा फटका बसला आहे. ती ६ व्या स्थानावरुन थेट १० व्या स्थानावर पोहचली आहे. याशिवाय पाकिस्तानच्या सिदरा अमीन हिने टॉप १० मध्ये एन्ट्री मारत नवव्या स्थानावर कब्जा केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alyssa Healy Jumps in ODI Rankings; Sidra Ameen Enters Top 10

Web Summary : Alyssa Healy's century against India propelled her to fourth in the ICC ODI rankings. Smriti Mandhana retains top spot. Sidra Ameen of Pakistan enters the top 10, while Tazmin Brits drops significantly.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५वन डे वर्ल्ड कपआयसीसीस्मृती मानधनाभारतीय महिला क्रिकेट संघ