Join us  

सूर्यकुमार यादवकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व, संघात ना रोहित शर्मा, ना विराट कोहली 

ICC Men's T20I Team of the Year 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आज २०२३च्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 3:10 PM

Open in App

ICC Men's T20I Team of the Year 2023 ( Marathi News ) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आज २०२३च्या सर्वोत्तम ११ खेळाडूंचा ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. भारताचा मीस्टर ३६० सूर्यकुमार यादव याच्याकडे या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या संघात सूर्यकुमारसह भारताच्या ४ युवा खेळाडूंना जागा पटकावली आहे. 

संघात सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालची निवड केली गेली आहे. यशस्वीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने १४ सामन्यांत १५९च्या स्ट्राईक रेटने ४३० धावा केल्या. त्याने आशियाई स्पर्धेत नेपाळविरुद्ध ४९ चेंडूंत १०० धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मैदानावरील ट्वेंटी-२०त त्याने २५ चेंडूंत ५३ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४१ चेंडूंत ६० धावा चोपल्या. यशस्वीसोबत सलामीला इंग्लंडचा फिल सॉल्ट असणार आहे, ज्याने ८ डावांमध्ये ३९४ धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्याच्याकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल. त्याने १३ सामन्यांत ३८४ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार आयसीसी ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे आणि त्याने सलग दुसऱ्या वर्षी आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात स्थान पटकावले आहे. त्यानंतर मार्क चॅम्पमन ( न्यूझीलंड), सिकंदर रझा ( झिम्बाब्वे), उगांडाचा अल्पेश रामजानी, आयर्लंडचा मार्क एडर यांचा क्रमांक आहे.

भारताचा रवी बिश्नोई याने या संघात स्थान पटकावले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने मागील वर्षी ४४ षटकांत १८ विकेट्स घेतल्या आणि तो ट्वेंटी-२०तील नंबर १ गोलंदाजही होता. त्याच्याह अर्शदीप सिंग यानेही या संघात स्थान पटकावले आहे. त्याने २०२३ मध्ये २१ सामन्यांत २६ विकेट्स पटकावले. झिम्बाब्वेच्या रिचर्ड एनगारावा हा ११ वा खेळाडू आहे.

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवयशस्वी जैस्वालआयसीसीटी-20 क्रिकेटअर्शदीप सिंग