Join us

ICC Men's T20 World Cup Qualifier A : OMG, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत ३६ धावांत प्रतिस्पर्धींना गुंडाळलं अन् १७ चेंडूंत मिळवला विजय 

ICC Men's T20 World Cup Qualifier A : पराभूत संघाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही आणि त्यांच्या एकूण धावसंख्येत ४ अतिरिक्त धावाही आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:24 IST

Open in App

ICC Men's T20 World Cup Qualifier A : आयसीसी पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या A गटात आज ओमान संघाने इतिहास घडवला. फिलिपाईन्स संघाला त्यांनी १५.२ षटकांत ३६ धावांवर गुंडाळले आणि हे माफक लक्ष्य १७ चेंडूंत पार केले. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या फिलिपाईन्सच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. कर्णधार  व सलामीवीर डॅनिएल स्मिथ ( ७) हा संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानंतर हर्न इसोरेन ( ६) व  हेन्री टायलर ( ६) यांनी सर्वाधिक धावा केल्या. ओमानच्या खवार अलीने ३.२ षटकांत ११ धावांत ४ विकेट्स घेतल्या. कलीमुल्लाह ( २-५), आमीर कलीम ( २-२) व फय्याज बट ( २-७) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ओमानने ४ अतिरिक्त धावा दिल्याने फिलिपाईन्सची धावसंख्या ३६ वर पोहोचली.

प्रत्युत्तरात ओमानने २.५ षटकांत १ विकेट गमावून सामना जिंकला. खुर्रम नवाजने १२ चेंडूंत  ५ चौकार व  २ षटकारांसह नाबाद ३३ धावा केल्या. 

टॅग्स :आयसीसीटी-20 क्रिकेट
Open in App