Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK Live Streaming : भारत-पाक हाय-व्होल्टेज सामना! जाणून घ्या दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड अन् खेळपट्टीचा 'मिजास'

 नाणेफेकीचा कौल ठरू शकतो एक्स फॅक्टर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:25 IST

Open in App

ICC Mens T20 World Cup 2026 India vs Pakistan Head To Head Record  Live Streaming  : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या नौटंकीनंतर आता या सामन्यावर पावसाचे सावट आहे. आदल्या दिवशी ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडलेला नाही. त्यामुळेच भारत-पाक यांच्यातील लढत नियोजित वेळेनुसार, होईल अशी अपेक्षा आहे. इथं जाणून घेऊयात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील महामुकाबला कसा पाहता येईल? त्यासंदर्भातील सविस्तर माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दोन्ही ंसघांच्या नावे प्रत्येकी  २-२ विजय

भारत-पाकिस्तान दोन्ही संघांनी स्पर्धेची दमदार सुरुवात दमदार विजयाने केली आहे. गत चॅम्पियन भारतीय संघाने  भारताने अमेरिका आणि नामिबियाला पराभूत करत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग १० विजय मिळवण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या संघाने नेदरलँड्स आणि अमेरिका यांच्याविरुद्धच्या विजयासह दोन विजय नोंदवले आहेत. 

कोलंबोत आज पाऊस पडला तर काय? सामना राखीव दिवशी होणार की..,ICCचा तो नियम वाचून तुम्हाला बसेच धक्का

भारत-पाक हेड टू हेड रेकॉर्ड (IND vs PAK Head-to-Head Record)

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या ८ पैकी ७ सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली असून फक्त एकदा पाकिस्तानच्या संघाने सामना जिंकला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १६ पैकी १३ सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला आहे. त्यामुळे हा विजयी सिलिसिला यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही कामय राहिल अशी आशा आहे.  कशी असेल आर. प्रेमदासाची खेळपट्टी?

कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर याआधी झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत झाली आहे. हा सामना ज्या खेळपट्टीवर झाला त्याच खेळपट्टीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नियोजित आहे. ही खेळपट्टी संथ आणि संयमाची परीक्षा घेणारी असेल, असा अंदाज आहे. खेळपट्टीवर फिरकीसाठी अधिक अनुकूल असेल. दोन्ही संघात उत्तम फिरकीपटू आहेत. याशिवाय नव्या चेंडूवर बुमराह विरुद्ध शाहीन आफ्रिदी यांच्यात कोण भारी ठरणार तेही पाहण्याजोगे असेल. नाणेफेकीचा कौल ठरू शकतो एक्स फॅक्टर, पण...

भारत-पाक सामना सायंकाळच्या सत्रात होणार आहे. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता असल्याने धावांचा पाठलाग करणे अधिक फायद्याचे ठरेल. त्यामुळे नाणेफेक जिंकून दोन्ही संघातील फलंदाज पहिल्यांदा गोलंदाजी करण्याला पसंती देऊ शकतात. याउलट या सान्यात मोठा दबाव असतो. त्यामुळे धावांचा पाठलाग करण्याचा निर्णयही धाडसीच असेल.

 भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

 सैम अयुब, साहिबजादा फरहान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा (कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, उस्मान तारिक, अबरार अहमद.

 लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलीकास्ट 

  • सामना- भारत विरुद्ध पाकिस्तान 
  • सामन्याची तारीख : रविवार, १५ फेब्रुवारी २०२६
  • सामन्याची वेळ : सायंकाळी ७:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार नाणेफेक सायंकाळी ६:३० वाजता)
  • टीव्ही चॅनेल: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (भारत)
  • लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार अ‍ॅप आणि वेबसाइट (भारत)

 

English
हिंदी सारांश
Web Title : IND vs PAK: High-voltage clash! Who will luck favor?

Web Summary : India faces Pakistan in a T20 World Cup showdown in Colombo. India dominates head-to-head records. Rain looms. The pitch favors spin. Toss could be key due to dew. Streaming on JioHotstar.
टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६भारत विरुद्ध पाकिस्तानटी-20 क्रिकेटभारतीय क्रिकेट संघ