T20 WC 2026 : सेमीफायनल-फायनल आधीच विश्वविक्रम; Viewership चा आकडा ५०,००,००,००० पार

भारतातील विक्रमी प्रेक्षकसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:40 IST2026-03-04T15:21:45+5:302026-03-04T15:40:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC Mens T20 World Cup 2026 Breaks Viewership Records Crosses 500 Million Viewers In India | T20 WC 2026 : सेमीफायनल-फायनल आधीच विश्वविक्रम; Viewership चा आकडा ५०,००,००,००० पार

T20 WC 2026 : सेमीफायनल-फायनल आधीच विश्वविक्रम; Viewership चा आकडा ५०,००,००,००० पार

ICC Men's T20 World Cup 2026 : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या यंदाच्या दहाव्या हंगामात क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. सेमीफायनलच्या लढतींना सुरुवात होण्याआधीच या स्पर्धेतील आधीचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. यंदाचा हंगाम हा आतापर्यंतच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक प्रेक्षकवर्ग लाभलेला हंगाम ठरला आहे. 

...अन् ती गोष्ट सत्यात उतरली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी एक्स अकाउंटवरुन यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली आहे. जय शाह त्यांनी सांगितले की, यंदाची विश्वचषक स्पर्धा अधिक व्यापक करण्याची महत्त्वाकांक्षा  होती. ही गोष्ट सत्यात उतरली असून चाहत्यांमध्ये या स्पर्धेबद्दल कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

भारतातील विक्रमी प्रेक्षकसंख्या

भारतात या मेगा स्पर्धेबाबत कमालीची उत्सुकता असल्याची आकडेवारी समोर आली आहे. एकूण  ५० कोटी चाहत्यांनी यंदाच्या हंगामातील स्पर्धेचा आनंद घेतला आहे. जय शाह यांनी विशेष आनंद व्यक्त करत नमूद केले आहे की, भारतात कोणत्याही टी-२० वर्ल्ड कपसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी प्रेक्षकसंख्या आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या बाबतीत, जिओहॉटस्टारवर (JioHotstar) वर एकाच वेळी सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या तब्बल ६०.५ दशलक्ष  इतकी झाली, हा देखील एक जागतिक विक्रम आहे.

काय म्हणाले जय शाह?

आयसीसी अध्यक्षांनी या अभूतपूर्व यशाचे श्रेय चाहत्यांच्या क्रिकेटप्रेमाला दिले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची सुरुवातीलाच जागतिक स्तरावर ही स्पर्धा अधिक व्यापक ठरेल, हा उद्देश ठेवला होता. भारतीय चाहत्यांकडून मिळालेल्या या प्रचंड पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे.” आता स्पर्धेतील निर्णायक नॉकआउट सामने ४ मार्चपासून सुरू होत आहेत. जय शाह यांनी आशा व्यक्त केली की, येत्या सेमीफायनल आणि फायनल सामन्यांदरम्यान हा उत्साह आणखी वाढेल आणि नवीन विक्रम नोंदवले जातील. २०२६ च्या हंगामातील टी-२० विश्वचषक स्पर्धेत  प्रसारण आणि डिजिटल प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत एक नवा मापदंड गाठला असून, भविष्यात हा विक्रम मोडणे मोठे आव्हान ठरणार आहे.

Web Title : टी20 विश्व कप 2026: सेमी-फ़ाइनल से पहले ही 50 करोड़ दर्शक!

Web Summary : टी20 विश्व कप 2026 ने सेमी-फ़ाइनल से पहले ही दर्शक संख्या के रिकॉर्ड तोड़े, विश्व स्तर पर 50 करोड़ से अधिक दर्शक। भारत JioHotstar पर रिकॉर्ड-ब्रेकिंग डिजिटल जुड़ाव के साथ आगे है, जो क्रिकेट देखने के लिए एक बड़ी सफलता है।

Web Title : T20 WC 2026: Viewership soars past 500 million before semi-finals!

Web Summary : The T20 World Cup 2026 sets viewership records before the semi-finals, exceeding 500 million viewers globally. India leads with record-breaking digital engagement on JioHotstar, marking a monumental success for cricket viewership.