ICC T20 World Cup 2026 Australia Meet Sri Lanka In Thrilling Evening Encounter : वेस्ट इंडिज पाठोपाठ भारतीय संघाने यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मधील आपले स्थान पक्के केले आहे. ओमान, नामिबिया आणि नेपाळ हे तीन संघ या शर्यतीतून आउट झाले आहेत. दहाव्या दिवशीच्या ट्रिपल हेडरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात महत्त्वपूर्ण सामना रंगणार आहे. 'ब' गटात झिम्बाब्वेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला दणका दिला होता. या निकालानंतर या गटात दोन जागेसाठी तिघांमध्ये तगडी शर्यत पाहायला मिळत आहे. इथं जाणून घेऊयात ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंकेसह कोणता संघ कुठं आणि कुणाविरुद्ध मैदानात उतरणार त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
UAE विरुद्ध अफगाणिस्तान
'ड' गटात UAE आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघ हा सामना जिंकून 'जर-तर'च्या आशेवर स्पर्धेत टिकून आहेत. पण त्यांची डाळ शिजणं मुश्किलच आहे. या गटातून अफगाणिस्तान सुपर ८ च्या प्रबळ दावेदारांपैकी एक होता. पण दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या निकालानंतर या गटातून या दोन संघांसाठी सुपर ८ चा मार्ग सोपा झाला आहे.
कोलकाताच्या मैदानात रंगणार इंग्लंड विरुद्ध इटली यांच्यातील सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात दुपारी ३ वाजता इंग्लंड विरुद्ध इटली यांच्यातील सामना रंगल्याचे पाहायला मिळेल. हा सामना जिंकून इंग्लंडच्या संघाला सुपर ८ मधील स्थान पक्के करता येईल. जर उलटफेर झाला तर बांगलादेशच्या जागी अखेरच्या क्षणी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्कॉटलंडसाठी एक संधी निर्माण होईल. पण याची शक्यता फार कमी आहे.
'ब गटात' तिरंगी लढत, इंग्लंड-श्रीलंका दोघांसाठी सामना महत्त्वाचा
'ब' गटात यजमान श्रीलंकेसह झिम्बाब्वेच्या संघाने पहिल्या दोन सामन्यातील विजयासह प्रत्येकी ४-४ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. या गटातील बलाढ्य. संघाने २ पैकी फक्त १ सामना जिंकला आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना श्रीलंकेविरुद्धची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागेल. निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला तर ग्रुप टॉपर श्रीलंकेसाठी धोक्याची घंटा वाजेल. या गटात झिम्बाब्वे चमत्कार करण्याच्या मूडमध्ये आहे. त्यामुळे ही लढत आजच्या दिवसातील सुपर क्लायमेक्स ठरू शकते. सायंकाळी ७ वाजता श्रीलंकेतील पल्लेकेलेच्या मैदानात हा सामना रंगणार आहे.
कुठं आणि कसे पाहता येतील सामने?
टीव्ही चॅनेल : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (भारत)लाईव्ह स्ट्रीमिंग: जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइट (भारत)
Web Summary : Australia faces Sri Lanka in a critical T20 World Cup match. With Super 8 spots at stake, both teams need a win. Other matches include UAE vs. Afghanistan and England vs. Italy. Zimbabwe's performance adds intrigue to Group B.
Web Summary : ऑस्ट्रेलिया का श्रीलंका से टी20 विश्व कप में महत्वपूर्ण मुकाबला। सुपर 8 में जगह बनाने के लिए दोनों टीमों को जीत की जरूरत है। अन्य मैचों में यूएई बनाम अफगानिस्तान और इंग्लैंड बनाम इटली शामिल हैं। जिम्बाब्वे के प्रदर्शन ने ग्रुप बी में दिलचस्पी बढ़ा दी है।