नवी दिल्ली : लवकरच टी-20 विश्वचषकाचे (T20 World Cup 2022) बिगुल वाजणार आहे. या बहुचर्चित स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत, 8 संघांनी आधीच पात्रता फेरी गाठली आहे. उरलेल्या आठ संघांमध्ये पहिले क्वालिफायर सामने खेळवले जातील आणि यापैकी पात्र ठरलेले चार संघ सुपर-12 च्या फेरीत खेळतील. या बहुचर्चित स्पर्धेसाठी आयसीसीने (ICC) सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून 10 ऑक्टोंबरपासून हे सामने खेळवले जाणार आहेत.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ एकूण 2 सराव सामने खेळणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे. रोहित सेना 17 ऑक्टोंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध तर 19 ऑक्टोंबर रोजी न्यूझीलंडविरूद्ध मैदानात असणार आहे.
सराव सामने खालीलप्रमाणे -
10 ऑक्टोंबर -
वेस्टइंडिज विरूद्ध यूएई
स्कॉटलंड विरूद्ध नेदरलॅंड
श्रीलंका विरूद्ध झिम्बाब्वे
11 ऑक्टोंबर -
झिम्बाब्वे विरूद्ध आयर्लंड
12 ऑक्टोंबर -
वेस्टइंडिज विरूद्ध नेदरलॅंड
13 ऑक्टोंबर -
झिम्बाब्वे विरूद्ध नामिबिया
श्रीलंका विरूद्ध आयर्लंड
स्कॉटलंड विरूद्ध आयर्लंड
17 ऑक्टोंबर -
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका
इंग्लंड विरूद्ध पाकिस्तान
अफगाणिस्तान विरूद्ध बांगलादेश
19 ऑक्टोंबर -
अफगाणिस्तान विरूद्ध पाकिस्तान
बागंलादेश विरूद्ध दक्षिण आफ्रिका
भारत विरूद्ध न्यूझीलंड
टी-20 विश्वचषकात सुपर-12 पूर्वी आठ संघांमध्ये सामने खेळवले जातील. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-12 सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील.
पहिला राउंड
अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.
ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे.
सुपर-12 फेरी
गट 1 - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.
गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता.