Join us

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

क्रिकेटच्या पंढरीसह ७ मैदानात रंगणार ३३ सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 17:07 IST

Open in App

ICC Confirms Women's T20 World Cup 2026 Dates And Venues : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) आगामी महिला टी २० वर्ल्ड कप  स्पर्धेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी इंग्लंडच्या यजमानपदाखाली महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धे खेळवण्यात येणार आहे.  आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, १२ जून २०२६ पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून ५ जुलै २०२६ रोजी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानात  फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. लंडन येथील लॉर्ड्सच्या मैदानाशिवाय  सात वेगवेगळ्या मैदानात महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

१२ संघ ७ मैदानात खेळणार ३३ सामने 

आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत यंदा १२ संघांचा समावेश असून या स्पर्धेत एकूण ३३ सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सामने लंडमधील लॉर्ड्स मैदानासह एजबेस्टन, हँपशायर बाउल, हेडिंग्ले, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड, द ओव्हल आणि ब्रिस्टल काउंटी ग्राउंडवर खेळवण्यात येतील.

वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

हे आठ संघ पात्र, उर्वरित ४ संघ पात्रता फेरीतून मारतील एन्ट्री महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी ८ संघ पात्र ठरले आहेत. अन्य चार संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या पात्रता फेरीतून निवडले जातील. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडीज या संघांनी २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर आगामी वर्ल्ड कपचे तिकीट पक्के केले आहे. याशिवाय पाकिस्तान आणि श्रीलंका महिला संघाने आयीसीसी टी-२० रँकिंगमधील कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कमधील आपले स्थान पक्के केले आहे. 

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकभारतीय क्रिकेट संघआयसीसी