Join us

सलग १२ वेळा गमावला टॉस; पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या नावे झाला अनोखा रेकॉर्ड

भारतीय संघाचा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यापासून सुरुये टॉ़स गमावण्याचा सिलसिला, मिनी वर्ल्ड कपमध्ये नावे झाला अनोखा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 14:55 IST

Open in App

 India Create Unique Record Losing Most Consecutive 12 Time Toss  in ODI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात रंगला आहे. या सामन्यात भारतीय कॅप्टन रोहित शर्मानं पुन्हा एकदा टॉस गमावला. याआधी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले होते. मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे या सामन्यातील टॉस गमावल्यामुळे भारतीय संघाच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद झाली. भारतात रंगलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लढतीपासून ते आतापर्यंत भारतीय संघाने वनडेत १२ व्या वेळी टॉस गमावला आहे.  

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केली होती नेदरलँडची बरोबरी

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघानं बांगलादेश विरुद्धच्या लढतीने यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. या सामन्यातही रोहित शर्मानं टॉस गमावला होता. यासह भारतीय संघाने सलग ११ वेळा टॉस गमावत नेदलँड्स संघाच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आता त्यात आणखी भर पडली आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेशिवाय घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. या तिन्ही मालिकेत भारतीय संघाने टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले होते. 

भारतीय संघानं कधी अन् कुणाविरुद्ध गमावला टॉस

  • १९ नोव्हेंबर २०२३ आयसीसी वनडे वर्ल्ड कप भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
  • १७ डिसेंबर २०२३ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • १९ डिसेंबर २०२३ भारत वि दक्षिण आफ्रिका
  • २१ डिसेंबर २०२३ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
  • ०२ ऑगस्ट २०२४ भारत विरुद्ध श्रीलंका
  • ०४ ऑगस्ट २०२४ भारत विरुद्ध श्रीलंका
  • ०७ ऑगस्ट २०२४ भारत विरुद्ध श्रीलंका
  • ६ फेब्रुवारी २०२५  भारत विरुद्ध इंग्लंड
  • ९ फेब्रुवारी २०२५ भारत विरुद्ध इंग्लंड
  • १२ फेब्रुवारी २०२५ भारत विरुद्ध इंग्लंड
  • २० फेब्रुवारी २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुद्ध बांगलादेश
  • २३ फेब्रुवारी २०२५ ऑसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुद्ध पाकिस्तान 

 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरुद्ध बांगलादेशभारत विरुद्ध श्रीलंका