India Create Unique Record Losing Most Consecutive 12 Time Toss in ODI : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात रंगला आहे. या सामन्यात भारतीय कॅप्टन रोहित शर्मानं पुन्हा एकदा टॉस गमावला. याआधी बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले होते. मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे या सामन्यातील टॉस गमावल्यामुळे भारतीय संघाच्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद झाली. भारतात रंगलेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लढतीपासून ते आतापर्यंत भारतीय संघाने वनडेत १२ व्या वेळी टॉस गमावला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केली होती नेदरलँडची बरोबरी
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघानं बांगलादेश विरुद्धच्या लढतीने यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. या सामन्यातही रोहित शर्मानं टॉस गमावला होता. यासह भारतीय संघाने सलग ११ वेळा टॉस गमावत नेदलँड्स संघाच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आता त्यात आणखी भर पडली आहे. आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेशिवाय घरच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. या तिन्ही मालिकेत भारतीय संघाने टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले होते.
भारतीय संघानं कधी अन् कुणाविरुद्ध गमावला टॉस
- १९ नोव्हेंबर २०२३ आयसीसी वनडे वर्ल्ड कप भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
- १७ डिसेंबर २०२३ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- १९ डिसेंबर २०२३ भारत वि दक्षिण आफ्रिका
- २१ डिसेंबर २०२३ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
- ०२ ऑगस्ट २०२४ भारत विरुद्ध श्रीलंका
- ०४ ऑगस्ट २०२४ भारत विरुद्ध श्रीलंका
- ०७ ऑगस्ट २०२४ भारत विरुद्ध श्रीलंका
- ६ फेब्रुवारी २०२५ भारत विरुद्ध इंग्लंड
- ९ फेब्रुवारी २०२५ भारत विरुद्ध इंग्लंड
- १२ फेब्रुवारी २०२५ भारत विरुद्ध इंग्लंड
- २० फेब्रुवारी २०२५ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुद्ध बांगलादेश
- २३ फेब्रुवारी २०२५ ऑसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारत विरुद्ध पाकिस्तान
Web Title: ICC Champions Trophy IND vs PAK Rohit Sharma Loss Toss India Create Unique Record Losing Most Consecutive 12 Time Toss in ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.