अक्षर पटेलचा डायरेक्ट थ्रो! डोळ्याची पापणी लवण्याच्या आत इमामचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)

आयत्या वेळी संधी मिळाली, चांगली सुरुवात केली, पण सेट झाल्यावर पाक बॅटरनं पायावर मारुन घेतली कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 15:52 IST2025-02-23T15:49:56+5:302025-02-23T15:52:36+5:30

whatsapp join usJoin us
ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Axar Patel Direct throw Sends Imam-ul-Haq Back Watch Video | अक्षर पटेलचा डायरेक्ट थ्रो! डोळ्याची पापणी लवण्याच्या आत इमामचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)

अक्षर पटेलचा डायरेक्ट थ्रो! डोळ्याची पापणी लवण्याच्या आत इमामचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Axar Patel Runs Out Imam-ul-Haq During Ind-Pak CT 25 Match : भारताविरुद्ध दुबईच्या मैदानात रंगलेल्या हायहोल्टेज सामन्यात पाकिस्तानच्या संघाच्या सलामी जोडीनं संयमी सुरुवात केली. इमाम उल हक आणि बाबर आझम ही जोडी सेट झालीये असं वाटत असताना हार्दिक पांड्यानं पाकला पहिला धक्का दिला. बाबर आझमची विकेट घेत पांड्यानं सलामी जोडी फोडली. धावफलकावर ४१ धावा असताना पाकिस्तानच्या संघाला हा पहिला धक्का बसला. त्यानंतर फखर झमानच्या जागी संघात स्थान मिळालेल्या सलामीवीर इमाम उल हक याने मोठी चूक केली अन् आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. अक्षर पटेलनं क्षेत्ररक्षणाचा अद्भूत नजराणा पेश करत भारतीय संघाला त्याच्या रुपात दुसरी विकेट मिळवून दिली.   

अक्षर पटेलची चपळाई, इमान उल हकचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

बाबर आउट झाल्यावर एकेरी धाव घेण्याच्या नादात इमाम उल हकनं आपली विकेट गमावली. अक्षर पटेलनं डायरेक्ट थ्रो करत पाकिस्तानच्या दुसऱ्या सलामीवीराचा खेळ खल्लास केला. अक्षर पटेल हा एक ऑल राउंडर खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंगसह फिल्डिंगमध्ये तो कमालीच्या कामगिरीनं लक्षवेधून घेताना पाहायला मिळते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याचा फिल्डिंगमधील तोरा अगदी पुन्हा पुन्हा पाहण्याजोगा होता. पाकिस्तानी खेळाडूच्या कुलदीप यावदच्या गोलंदाजीवर डायरेक्ट स्टंप टिपत त्याने इमामचा करेक्ट कार्यक्रम केला.

दहाव्या षटकात अक्षर पटेलनं साधला डाव, पाकला बसला दुसरा धक्का

अक्षर पटेल पाकिस्तानच्या डावातील दहव्या षटकात आपल्या क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर इमामनं पुढे येऊन मिड ऑनच्या दिशेनं फटका खेळला. त्यानंतर त्याने लगेच एकेरी धाव घेण्यासाठी मैदान सोडले. पण बापू अर्थात अक्षर पटेल एकदम वेगाने चेंडूवर आला अन् त्याने स्टंपवर अचूक निशाणा साधत पाकिस्तानच्या संघाला दुसरा धक्का देत भारतीय संघाला मोठा दिलासा दिला. इमाम उल हक २६ चेंडूचा सामना करून अवघ्या १० धावांवर बाद झाला. त्याला एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही.

 

Web Title: ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Axar Patel Direct throw Sends Imam-ul-Haq Back Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.