Indian National Anthem instead of Australia’s before AUS vs ENG match : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना पाकिस्तान येथील लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर रंगला आहे. या लढती आधी एक मोठी चूक झाल्याचे पाहायला मिळाले. मॅच इंग्लंड-ऑस्ट्रेलियाची आणि राष्ट्रगीत लावण्यात आले ते भारताचे असा काहीसा सीन पाहायला मिळाला. जी एक मोठी चूक आहे.
नेमकं काय घडलं?
प्रत्येक सामना सुरु होण्याआधी एकमेकांविरुद्ध भिडणारे दोन्ही संघ आपापल्या देशाच्या राष्ट्रगीतासाठी मैदानात उभे राहतात. परंपरेनुसार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया संघही राष्ट्रगीतासाठी उभे राहिले. यावेळी इंग्लंडचे राष्ट्रगीत झाल्यावर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत वाजण्याऐवजी भारताचे राष्ट्रगीत जन गण मन वाजवण्यास सुरुवात झाली. दोन सेकंदानंतर ही चूक सुधारण्यात आली. सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे.
आधी पाकमध्ये तिरंगा डौलात फडकला, आता राष्ट्रगीत वाजलं
भारतीय संघाने सुरक्षिततेच्या कारणास्तवर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. परिणामी भारतीय संघाचे सर्व सामने हे हायब्रिड मॉडेलनुसार दुबईच्या मैदान खेळवण्यात येणार आहेत. भारत-पाक यांच्यातील सामना २३ फेब्रुवारीला रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारताचे सामने दुबईत होणार असल्याचे सांगत आधी पाकमधील स्टेडियममध्ये भारतीय राष्ट्रध्वज दिसला नव्हता. याची चांगलीच चर्चा रंगल्यावर अखेर कराचीत सलामीच्या लढतीत भारताचा तिरंगा पाकिस्तानी स्टेडियमवर डौलात फडकताना दिसला. त्यानंतर आता चुकीमुळे लाहोरच्या मैदानात भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.