Pakistan vs India : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील हायहोल्टेज लढत रंगणार आहे. या सामन्याकडे फक्त दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांचीच नव्हे तर जगभरातील मंडळींच्या नजरा खिळलेल्या असतील. दुबईच्या मैदानात पाकिस्तान क्रिकेट संघाचा रेकॉर्ड चांगला आहे. यामागच कारण त्यांनी या मैदानात इतर संघाच्या तुलनेत अधिक सामने खेळले आहेत. पण पाकिस्तानसाठी भारतीय संघाविरुद्धचा सामना एक मोठे आव्हान असेल. त्यांच्यासाठी ही 'करो वा मरो'ची लढत आहे. दोन्ही संघातील खेळाडूंच्या कामगिरीशिवाय या सामन्यात टॉसलाही खूप महत्त्व आहे. जाणून घेऊयात दुबईच्या मैदानातील मागील १० सामन्यातील रेकॉर्ड्सवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मागील १० सामन्यातील ७ सामन्यात धावांचा पाठलाग करणारा टीमनं मारलीये बाजी
भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपला पहिला सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरच खेळला. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना ६ विकेट्सनं विजय नोंदवला होता. या सामन्यात बांगलादेशच्या संघानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग केली होती. हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. दुबईच्या मैदानातील खेळपट्टी स्लो आहे. चेंडू जुना झा्लयावर फलंदाजांसाठी धावा करणं थोडं मुश्किल होते. पण संध्याकाळच्या वेळी फलंदाजांसाठी इथं थोडी अनुकूल परिस्थितीतीही निर्माण होते. मागील १० पैकी ७ सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने बाजी मारली असून फक्त ३ वेळा पहिल्यांदा बॅटिंग करणारा संघ जिंकलाय. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ धावांचा पाठलाग करण्याला पसंती देऊ शकतो. मागच्या ११ सामन्यात टीम इंडियाला जिंकता आलेला नाही टॉस
भारतीय संघां २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये अखेरचा टॉस जिंकला होता. त्यानंतर जवळपास ११ वनडे सामन्यात भारतीय संघान टॉस गमावल्याचे पाहायला मिळाले आहे. जर या सामन्यात भारतीय संघान टॉस गमावला तर वनडे फॉर्मेटमध्ये सातत्याने सर्वाधिक वेळा टॉस गमावण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या नावे होईल.