चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यात धमाकेदार कामगिरी केल्यावर न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघ अडखळत खेळताना दिसले. न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतल्यावर कॅप्टन रोहित शर्मा आणि उप कॅप्टन शुबमन गिल जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्लो फिफ्टीसह अय्यरनं सावरला संघाचा डाव
तिसऱ्या षटकात गिल माघारी फिरल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहलीही स्वस्तात माघारी फिरले. ३ बाद ३० धावा अशी परिस्थितीत असताना श्रेयस अय्यरनं संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने अर्धशतक झळकावण्यासाठी ७५ चेंडूचा सामना केला. वनडे कारकिर्दीतील त्याची आतापर्यंतची सर्वात स्लो फिफ्टी ठरली. याआधी २०२२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने अर्धशतकासाही ७४ चेंडू खेळले होते.
अक्षर पटेलसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी
श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या जोडीनं चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. ही जोडी सेट झालीये असं वाटत असताना रचिन रविंद्रनं अक्षर पटेलच्या रुपात टीम इंडियाला चौथा धक्का दिला. तो ६१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. अक्षरच्या अर्धशतकासह या जोडीची शतकी भागीदारी अवघ्या २ धावांनी हुकली.
एखाद्या फास्टर फिफ्टीपेक्षा अनमोल ठरते त्याची स्लो खेळी
संघ अडचणीत असताना संयमी अंदाजात डाव सावरल्यानंतर तो शतकी खेळीकडे वाटचाल करताना दिसला. भारताच्या डावातील ३७ व्या षटकात विल ओ'रुर्के (Will O'Rourke) याच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो फसला. अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर पुल शॉट मारण्याच्या नादात तो कॅच आउट झाला. या सामन्यात त्याने ९८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ७९ धावांचे योगदान दिले. त्याने वेळ घेतला असला तरी गियर बदलून त्याने केलेली ही संयमी खेळी टीम इंडियाला मोठ्या अडचणीतू बाहेर काढणारी आहे. त्यामुळे एखाद्या फास्टर फिफ्टीपेक्षाही त्याच्या या स्लो फिफ्टीच मोल अनमोल ठरते.
Web Title: ICC Champions Trophy 2025 IND vs NZ Shreyas's Slowest Fifty In ODIs His Previous Lowest When He Got 74 Ball Fifty Against West Indies In 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.