ICC Womens World Cup 2025 Prize Money : भारत आणि श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली ३० सप्टेंबरपासून महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं रोख रक्कम स्वरुपातील बक्षीसांची नुकतीच घोषणा केली. यंदाच्या हंगामात महिला वर्ल्ड कप विजेत्या संघाला ४.४८ मिलियन डॉलर (३९.४ कोटी एवढे मोठे बक्षीस दिले जाणार आहे. २०२२ च्या महिला वनडे वर्ल्ड कपच्या तुलनेत ही रक्कम चारपट अधिक आहे. एवढेच नाही तर एकूण बक्षीसाची रक्कम ही २०२३ च्या हंगामातील पुरुष वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपेक्षाही अधिक आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०२३ च्या पुरुष वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही मिळालं नव्हतं एवढं बक्षीस
८ संघांचा सहभाग असलेल्या स्पर्धेसाठी एकूण १३.८८ मिलियन डॉलर इतके बक्षीस देण्यात येणार आहे. ही रक्कम २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील बक्षीसापेक्षा अधिक आहे. गत हंगामात ३.५ मिलियन डॉलर एवढे बक्षीस देण्यात आले होते. एवढेच नाही तर या वेळीच्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण बक्षीसाची रक्कम ही २०२३ मध्ये झालेल्या पुरुष वर्ल्ड कप स्पर्धेतील बक्षीसांपेक्षाही (१० मिलियन डॉलर) अधिक आहे.
'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र
उप विजेत्यासह सहभागी संघांना किती बक्षीस मिळणार?
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत उप विजेत्या संघाला २.२४ मिलियन डॉलर (१९.७१ कोटी) इतके बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय सेमीफायनलमध्ये पराभूत दोन्ही संघाला प्रत्येकी १.१२ मिलियन डॉलर (९.८ कोटी) इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाईल. साखळी फेरीत प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला ३४,३१४ डॉलर (३०.१९ लाख) इतकी रक्कम दिली जाणारा आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघाला प्रत्येकी ७००,००० डॉलर (६.१६.कोटी) तर सातव्या आणि आठव्या स्थानावरील संघाला प्रत्येकी २८०, ००० डॉलर (२.४६ कोटी) एवढी रक्कम बक्षीस स्वरुपात मिळेल. याशिवाय स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक संघाला २५०,००० डॉलर (२.२० कोटी) इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
Web Title: ICC Boosts Womens World Cup 2025 Prize Money By Record 297 Setting New Benchmark For Gender Equality In Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.